ETV Bharat / state

Loudspeaker controversy: भोंग्याच्या वादावर बोलावलेल्या बैठकीला राज ठाकरेंची अनुपस्थिती!

मशिदीवरील भोंगे उतरवावे यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी आवाज उठवला (Loudspeaker controversy) आहे. त्यानंतर राज्यात हा विषय चांगलाच गाजला या संदर्भात सरकारने नियमावली जारी केली तसेच हा वाद संपवण्यासाठी सर्व पक्षीय बैठक (meeting called on Loudspeaker controversy) बोलावली आहे. मात्र या बैठकीला स्वत: राज ठाकरेच उपस्थित राहणार नसल्याचे (Absence of Raj Thackeray) समोर आले आहे.

author img

By

Published : Apr 25, 2022, 9:53 AM IST

Updated : Apr 25, 2022, 10:19 AM IST

राज ठाकरे

मुंबई: राज्य सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत मार्गदर्शक तत्वे ठरवण्यासाठी सर्वपक्षीयांची आज बैठक बोलावली आहे. या सर्वपक्षीय बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी होणार नाहीत या बैठकीला मनसेकडून माजी आमदार बाळा नांदगावकर आणि मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे उपस्थित राहणार आहेत. गुढीपाडवा मेळाव्यात राज्यातील मशिदीवरील भोंगे न उतरवण्यास समोर हनुमान चालीसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.

३ मे पर्यंत भोंगे उतरवा, अन्यथा मनसे हे भोंगे उतरवेल, असे विधान राज ठाकरे यांनी केले होते. देशभरातील हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी राज्य सरकारने नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या नेतृत्वाखाली धोरण आखण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे ठरवण्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांची बैठक बोलावली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होईल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेकडून बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित राहणार आहेत. सर्वच पक्षांच्या किमान दोन प्रतिनिधींना बैठकीला उपस्थित राहण्यासाठी नियंत्रण देण्यात आले आहे. भोंग्यांबाबत राज्य सरकारकडून सर्व धार्मिक स्थळासाठी ही मार्गदर्शक सूचना जाहीर केली जाणार आहे.

  • MNS leaders Sandeep Deshpande, Bala Nandgaonkar, and Nitin Sardesai will attend the meeting called by the Maharashtra government.

    — ANI (@ANI) April 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा : BJP delegation: भाजप आक्रमक शिवसेने विरोधात शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिव, मंत्र्यांना भेटणार

Last Updated : Apr 25, 2022, 10:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.