ETV Bharat / state

'आप'ने नाकारला आंबेडकरांना पाठिंबा; हिंगोली, दिंडोरीत अपक्ष उमेदवारांना पाठिंबा - भाजप

‘आम्ही गेली २ दिवस आंबेडकरांशी चर्चेचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आमच्या स्थानिक नेत्यांना प्रतिसाद दिला नाही. कदाचित आमच्या पाठिंब्याची त्यांना गरज नसावी. त्यामुळे आपने अकोला आणि सोलापुरात आंबेडकरांना पाठिंबा द्यायचा नाही, असा निर्णय घेतला असल्याचे आपचे राज्य समन्वयक ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी आज मुंबईत सांगितले.

आपने प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा नाकारला
author img

By

Published : Apr 11, 2019, 9:29 PM IST

मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर आणि अकोल्यातील उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार नाही, असे आम आदमी पक्षाने (आप) गुरुवारी स्पष्ट केले. वंचित आघाडीशी समविचारी असलेल्या आपने पाठिंबा नाकारुन सोलापुरात आंबेडकरांना चांगलाच झटका दिला असून यासोबत राज्यातही आपने इतर उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

या महत्त्वाच्या निर्णयासोबतच आपच्या राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात स्थानिक समित्या आहेत. भाजप वगळता पाठिंब्याबत निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाने या समित्यांना दिलेले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यावेळी अकोला आणि सोलापूर अशा २ मतदारसंघातून उभे आहेत. सोलापुरात आंबेडकरांना एमआयएम, माकप यासह समस्त आंबेडकरी विचारधारेच्या मंडळींनी पाठिंबा दिलेला आहे. आप यावेळी राज्यात एकही जागा लढवत नाही. आप व बहुजन वंचित आघाडी या दोघांचाही भाजप हा समान शत्रू आहे. त्यामुळे आप किमान सोलापुरात आंबेडकरांना पाठिंबा देईल, असे सर्वांचे गृहीतक होते. मात्र दोघांतील विसंवादामुळे ते गृहीतक फेल ठरले आहे.

‘आम्ही गेली २ दिवस आंबेडकरांशी चर्चेचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आमच्या स्थानिक नेत्यांना प्रतिसाद दिला नाही. कदाचित आमच्या पाठिंब्याची त्यांना गरज नसावी. त्यामुळे आपने अकोला आणि सोलापुरात आंबेडकरांना पाठिंबा द्यायचा नाही, असा निर्णय आज घेतला असल्याचे आपचे राज्य समन्वयक ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी आज मुंबईत सांगितले.

आज मतदान झालेल्या काही जागांसह विदर्भातील १२ जागांवर आपने अॅड. श्रीहरी अणे यांच्या विदर्भ राज्य आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. दिंडोरी (टीकाराम बागुल, अपक्ष) आणि हिंगोली (संदेश चव्हाण, अपक्ष) यांना आपने पाठिंबा दिला आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्याठिकाणी मतदान आहे त्या मतदारसंघातील पाठिंब्याचा निर्णय १३ एप्रिलला घेतला जाणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

Intro:'आप’ ने नाकारला आंबेडकरांना पाठिंबा; हिंगोली, दिंडोरीत 'आप'चा अपक्ष उमेदवारांना पाठिंबाBody:'आप’ ने नाकारला आंबेडकरांना पाठिंबा; हिंगोली, दिंडोरीत 'आप'चा अपक्ष उमेदवारांना पाठिंबा
आप’चे राज्य समन्वयक ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांची माहिती

(स्टोक व्हीज्वल वापरावेत)

मुंबई, ता. 11 :

वंचित बहुजन आघाडीचे सोलापुर आणि अकोल्यातील उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार नाही, असे आम आदमी पक्षाने (आप) गुरुवारी स्पष्ट केले. वंचित आघाडीशी समविचारी असलेल्या ‘आप’ने पाठिंबा नाकारुन भाजप उमेदवाराला सोलापुरात आंबेडकरांना चांगलाच झटका दिला असून यासोबत राज्यातही 'आप'ने इतर उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
या महत्त्वाच्या निर्णयासोबतच आपच्या राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात स्थानिक समित्या आहेत. भाजप वगळता पाठिंब्याबत निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाने या समित्यांना दिलेले आहेत.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यावेळी अकोला अन सोलापुर अशा दोन मतदारसंघातून उभे आहेत. सोलापुरात आंबेडकरांना एमआयएम, माकप,  यासह समस्त आंबेडकरी विचारधारेच्या मंडळींना पाठिंबा दिलेला आहे. आप यावेळी राज्यात एकही जागा लढवत नाही. आप व बहुजन वंचित आघाडी या दोघांचाही भाजप हा समान शत्रू आहे. त्यामुळे आप किमान सोलापुरात आंबेडकरांना पाठिंबा देईल, असे सर्वांचे गृहीतक होते. मात्र दोघांतील विसंवादामुळे ते गृहीतक फेल ठरले आहे.
‘आम्ही गेली दोन दिवस आंबेडकरांशी चर्चेचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आमच्या स्थानिक नेत्यांना प्रतिसाद दिला नाही. कदाचित आमच्या पाठिंब्याची त्यांना गरज नसावी. त्यामुळे आपने अकोला आणि सोलापुरात आंबेडकरांना पाठिंबा द्यायचा नाही, असा निर्णय आज घेतला असल्याचे ‘आप’चे राज्य समन्वयक ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी आज मुंबईत सांगितले.

आज मतदान झालेल्या काही जागांसह विदर्भातील 12 ‘आप’ने अॅड. श्रीहरी अणे यांच्या विदर्भ राज्य आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. दिंडोरी (टीकाराम बागुल, अपक्ष) आणि हिंगोली (संदेश चव्हाण, अपक्ष) यांना आपने पाठिंबा दिला आहे. दुसऱ्या टप्प्यात जेथे मतदान आहे, त्या मतदारसंघातील पाठिंब्याचा निर्णय १३ एप्रिल रोजी घेतला जाणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

Conclusion:'आप’ ने नाकारला आंबेडकरांना पाठिंबा; हिंगोली, दिंडोरीत 'आप'चा अपक्ष उमेदवारांना पाठिंबा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.