ETV Bharat / state

Aam Aadmi Party : दिल्लीच्या धर्तीवर आम आदमी पक्षाने केली मुंबईत प्रचाराला सुरुवात - दिल्ली महानगरपालिका

आम आदमी पक्षाने होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ( Municipal elections ) दिल्ली पॅटर्न राबवण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने ( Aam Aadmi Party ) घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Chief Minister Arvind Kejriwal ) मुंबई महानगरपालिकेत ( Mumbai Municipal Corporation ) सत्ता मिळवण्याचे जोरदार प्रयत्न करणार आहेत.

Chief Minister Arvind Kejriwal
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
author img

By

Published : Jan 1, 2023, 6:25 PM IST

आम आदमी पक्षाने केली मुंबईत प्रचाराला सुरुवात

मुंबई - आम् आदमी पक्षाला गुजरातमध्ये यश मिळालं नसलं ( Aam Aadmi Party ) तरी गुजरातच्या जनतेच्या मतदानाच्या जोरावर आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. दिल्ली, पंजाब नंतर आता आम आदमी पक्षाने महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला असून, होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ( Municipal elections ) दिल्ली पॅटर्न राबवण्याचा प्रचार देखील सुरू केला आहे.

आपला जनतेचा पाठिंबा? - आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर पक्षाचा आत्मविश्वास अजूनच द्विगुणीत झाला आहे. आम आदमी पक्षाची राजकीय घोडदौड सुरू आहे. पहिल्याच प्रयत्नात आम आदमी पक्षाने दिल्लीत सरकार बनवले. या सरकारला तेथील जनतेचा देखील तेवढाच पाठिंबा मिळत गेला. गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील दिल्लीच्या जनतेने पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनाच आपलं प्रतिनिधी निवडलं.

दिल्ली महापालिकेत सत्ता - दिल्लीनंतर गेल्या वर्षी झालेल्या पंजाबमध्ये देखील आम आदमी पक्षाला पंजाबच्या जनतेने बहुमत देऊन सत्तेवर आणलं. नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत पंधरा वर्षे असलेली भारतीय जनता पक्षाची सत्ता उलटून आम आदमी पक्षाने महानगरपालिकेत ( Delhi Municipal Corporation ) देखील सत्ता काबीज केली.

आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा - गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला हवं तसं यश मिळालं नसलं तरी, गुजरातच्या जनतेने दिलेल्या मतदानाच्या जोरावर आम आदमी पक्ष देशांमध्ये आठवा राष्ट्रीय पक्ष म्हणून गणला जाऊ लागला आहे. त्यामुळे देशभरात असलेल्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा विश्वास वाढला असून महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि खास करून महानगरपालिकेच्या निवडणुकांवर आता आम आदमी पक्षाने आपलं लक्ष केंद्रित केला आहे.

मनपा निवडणुकांसाठी वापरणार दिल्ली पॅटर्न - आम आदमी पक्षाने प्रथमता दिल्लीमध्ये सत्ता काबीज केली. दिल्लीमध्ये सत्ता मिळाल्यानंतर सर्वात प्रथम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वसामान्य लोकांच्या थेट मनाला भिडणाऱ्या मुद्द्यांवर हात घातला. विज पाणी शिक्षण आरोग्य हे सर्व दिल्लीच्या जनतेला अगदी मोफत मिळेल याचे नियोजन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं. या सर्व सुविधांसाठी याआधी दिल्लीच्या जनतेचा भरमसाठ पैसा जात होता. मात्र सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या सर्व गोष्टी मोफत द्यायला सुरुवात केली. आणि आम आदमी पक्षाची घोडदोड दिल्लीपासून पंजाब गुजरातपर्यंत पाहिला मिळते. आता आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात आपला मोर्चा वळवला आहे.

दिल्ली बदलली आता मुंबईची पाळी - विज, पाणी, शिक्षण आणि आरोग्याला महाराष्ट्रातील जनतेचा किती पैसा जातोय. याकडे महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेचे लक्ष वेधण्याचं काम आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झाल आहे. त्याबाबत प्रचार देखील नेत्यांकडून सुरू झाला आहे. आम आदमी पक्षाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलं असून "दिल्ली बदलली, आता मुंबईची पाळी" या घोषवाक्यातून मुंबईच्या नाक्या नाक्यावर आणि गल्लीबोळात प्रचार करायला आतापासूनच सुरुवात केली आहे. प्रचार करत असताना आम आदमी पक्षाकडून प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं गेलं असून, या पत्रकात मुंबईत शिक्षण आरोग्य पाणी वीज याच्यावर सामान्य मुंबईकरांचा किती पैसा खर्च होतो आणि दिल्लीतील जनतेचा तोच किती पैसा वाचतो याची तुलना करण्यात आली आहे.

विज - दिल्लीतील जनतेसाठी 200 युनिट पर्यंत राज्य सरकारने वीज मोफत केली आहे तर त्याच 200 युनिटचा मुंबईत सामान्य नागरिकांना महिन्याकाठी जवळपास पंधराशे रुपये भरावे लागतात

पाणी - दिल्लीतील जनतेला दोन हजार लिटर पाणी मोफत दिले जातात तर या पाण्याच्या साठी मुंबई महानगरपालिका नागरिकांकडून 120 रुपये आकारते.

महानगरपालिकेतील शिक्षण व्यवस्था - दिल्ली सरकारने महानगरपालिकेच्या शाळेचा दर्जा अत्यंत उत्तम केला असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिल्लीच्या महानगरपालिकेच्या शाळेतून दिले जातं. तर हेच शिक्षण घेण्यासाठी किमान मुंबईकरांना दर महिन्याला दोन हजार रुपयांचा खर्च होतो.

आरोग्य - दिल्ली सरकारने प्रत्येक विभागात "महौला क्लिनिक" सुरू केली आहेत. तर तेथेच शासकीय रुग्णालयात प्रत्येक आजारावर मोफत उपचार केले जातात. मात्र मुंबईकरांसाठी आरोग्याचा खर्च अंदाजित महिन्याला कुटुंबासाठी दोन हजार रुपये एवढा येत असतो.

महिलांसाठी बस सेवा मोफत - दिल्लीतील महिलांसाठी मोफत प्रवासाची सुविधा राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र तोच प्रवास मुंबईत करण्यासाठी एका महिलेला महिन्याकाठी पाचशे रुपयापर्यंत खर्च येत असतो. हा सर्व खर्च जर पाहिला तर अंदाजेत सहा हजार रुपयांच्या वर जातो. मात्र यासाठी दिल्लीतील जनतेला एक पैसाही मोजावा लागत नाही. तर, तिथेच प्रत्येक सामान्य मुंबईकर यासाठी महिन्याला जवळपास सहा हजार रुपये भरतो याची तुलना आम आदमी पक्ष यांनी आपल्या पत्रकातून केली आहे. या पत्रकांचा वाटप प्रत्येक वार्डामध्ये जाऊन आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते नेते करत आहेत. माहीम परिसरात वार्ड क्रमांक 190 परिसरात आम आदमी पक्षाच्या स्थानिक नेत्या प्रणाली गिरीश राऊत यांनी असे पत्रक वाटून दिल्लीमध्ये असलेल्या आम आदमी पक्ष कशाप्रकारे जनतेची सेवा करत आहे तर तीच सेवा द्यायला मुंबईत राज्य सरकार असेल किंवा मग महानगरपालिका असेल ही कशी लूट करते हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

निवडणुकांमध्ये उतरण्यासाठी आम आदमी पक्ष सज्ज - केवळ मुंबई महानगरपालिकाच नाही तर राज्यभरातील होऊ घातलेल्या 23 महानगरपालिकांच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उतरण्यासाठी आम आदमी पक्ष पूर्णपणे सज्ज आहे. ज्याप्रमाणे आधी दिल्ली त्यानंतर पंजाब मधील जनतेने आम आदमी पक्षाचा स्वीकार केला त्याच पद्धतीने होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात आम आदमी पक्षाचा स्वीकार केला जाईल असा विश्वास आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्रात आम्ही दिल्ली पॅटर्न राबवणार असून सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार सरकार आम्ही महाराष्ट्रातही उभा करू आणि आम आदमी पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सेवा करू यासाठी जनता आमच्यावर विश्वास ठेवेल असेही मत धनंजय शिंदे यांनी व्यक्त केल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.