ETV Bharat / state

आज...आत्ता...हिंगणघाटमधील गौरी विसर्जनदरम्यान वाहून गेलेल्या महिलेचा चंद्रपुरात आढळला मृतदेह

author img

By

Published : Sep 5, 2019, 10:49 AM IST

Updated : Sep 5, 2019, 2:53 PM IST

झरझर नजर...दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर...

आज...आत्ता...
  • 2.32 PM - वर्धा - हिंगणघाट येथील गौरी विसर्जनदरम्यान वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील तुळाना गावशिवारात नदी काठावर आढळला. दीपाली भटे असे मृत महिलेचे नाव आहे. यापूर्वी आई आणि मुलाचा मृतदेह मिळाला आहे. तसेच मुलगी अंजलीचा शोध सुरू आहे.
  • 2.31 PM - मुंबई - अभिनेत्री सोनम कपूरने अंधेरीचा राजा गणपतीचे दर्शन घेतले.
  • 2.30 PM - धुळे - शिरपूर तालुक्यातील टेंभे येथील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • 1.56 PM - पुणे - तृतीयपंथीयांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती पार पाडली.
  • 1.00 PM - मुंबई - मनसे नेते नितीन सरदेसाई कोहीनूर सीटीएनएलप्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल
  • 12.26 PM - जळगाव - पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्गावर वसलेल्या जळगाव शहरातून मुंबई तसेच पुणे येथे जाण्यासाठी खास रेल्वेगाडी नाही. त्यामुळे विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस तसेच खासगी ट्रॅव्हल्स बसेसचे जास्तीचे भाडे देऊन नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जळगावहून मुंबई-पुण्यासाठी विशेष रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
  • 12.25 PM - नागपूर - एसएनडीएल कंपनीविरोधात नागपूरकरांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे आता एसएनडीएल कंपनी बंद करून महावितरणकडे कार्य सोपवावे, अशी मागणी ऊर्जामंत्री चंद्रशेखर यांच्याकडे केली आहे.
  • 12.15 PM - सांगली - शासकीय रुग्णालयात प्रसूतीदरम्यान एका गरोदर महिलेसह तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
  • 10.35 AM - पुणे - प्रियकराने ब्लेडने वार करून अल्पवयीन प्रेयसीची हत्या केली आहे. पुण्यातील मावळ येथे ही घटना घडली.
  • 10.00 AM - मुंबई - मुंबई व शहरात पडलेल्या पावसामुळे बुधवारी काही ठिकाणी रुळावर पाणी साचले होते. यामुळे लोकलची सीएसएमटी ते पनवेल व सीएसएमटी ते ठाणे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. आज गुरुवारी ही सेवा पूर्ववत झाल्याची माहिती आहे.
  • 8.30 AM - मुंबई - बुधवारी (दि.४सप्टेंबर)ला झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या डबेवाल्यांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेले डबेवाले आज घरी पोहचू शकत नसल्याने सेवेत अडथळे निर्माण झाले आहेत
  • 8.15 AM - चंदीगढ - पंजाबच्या बाटलामधील एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला आहे. या घटनेमध्ये 23 लोक ठार, तर 27 लोक जखमी झाले आहेत. बुधवारी सांयकाळी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 5, 2019, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.