- 7:34 PM अमरावती - मुसळधार पावसाने 40 टक्के मोर्शी शहर पाण्याखाली
- 7:34 PM ठाणे - मध्य रेल्वे ठाणे आणि सीएसएमटी, चर्चगेट ते अंधेरी, वसई - विरार दरम्यान रेल्वे सेवा ठप्प... हार्बर मार्ग तसेच ठाणे ते कर्जत रेल्वे सेवा सुरळीत
- 6:06 PM पुणे - अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन... स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी मालिकेतील साकारली येसूबाईंची भूमिका
- 6:02 PM पुणे - जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवला... मुठा नदीत 31 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू
- 5:44 PM सांगली - कोयना धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरू... 72000 क्यूसेक्स पाण्याचा कृष्णा नदीत विसर्ग... नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- 5:16 PM सातारा - माजी खासदार राजू शेट्टींनी घेतली खासदार उदयनराजे भोसलेंची भेट... पक्ष न सोडण्याचा दिला सल्ला
- 5:16 PM पुणे - पुढचे पाच दिवस पावसाचे, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा... पुणे वेधशाळेचा अंदाज
- 4:28 PM औरंगाबाद - वंचित - एमआयएम यांची साथ सुटण्याची शक्यता... वंचितने दिली 8 जागांची ऑफर... एमआयएमला हव्या 50 जागा
- 4:20 PM दिल्ली - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सह मसूद अजहर, हाफिज सईद, झाकी-उ-रहमान लख्वी यांची दहशतवादी म्हणून घोषणा
- 4:15 PM मुंबई - रायगड जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर स्वगृही... उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेतला सेनेत प्रवेश
- 4:06 PM मुंबई - पूर्व उपनगरात पावसाने घेतली विश्रांती
- 4:03 PM रायगड - नागोठणे अंबा नदीच्या पुरात अडकलेल्या दाम्पत्याला सुरक्षित बाहेर काढले... स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी केले बचाव कार्य
- 3:58 PM मुंबई - हार्बर मार्ग बंद झाल्याने मोनो रेल्वेवर प्रवाशांची गर्दी... तिकिटासाठी प्रवाशांची मोठी गर्दी.. मोनो 1 तासाहून अधिक उशिराने
- 12.11 PM : मुंबई - मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली. एनडीआरएफचे एक पथक कुर्ला येथीस बैल बाजाराकडे रवाना करण्यात आले.
- 12.06 PM : रायगड - पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावर वावार्ले गावा जवळ पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
- 12.05 PM : गडचिरोली - गेल्या २ तासांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहे. तसेच भामरागडमध्ये २४४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
- 11.38 AM : रायगड - कोकणभवन इमारतीच्या तळ मजल्यावर 3 फूट पाणी साचले आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.
- 10.06 AM : ठाणे - ठाण्यात मंगळवारपासूनच पाऊस पडत आहे. गेल्या तासाभरामध्ये 47 मिमी पावसाची नोंद झाली असून 24 तासात 177 मिमी पाऊस पडला आहे.
- 9.50 AM : रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील मुर तळवडे रस्त्यावर दरड कोसळली आहे. त्यामुळे जामदा खोऱ्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्ये मुर, काजीर्डा, कोळंब, वाळवंड, सावडाव जवळेथर, आजीवली, नेर्ले, जांभवडे अशा गावांचा समावेश आहे.
- 9.45 AM : पुणे - पुण्यातून कोकणात जाणाऱ्या ताम्हीणी-कोलाड रस्त्यावर निवे गावालगत दरड कोसळली. त्यामुळे पुणे-कोलाड रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
- 9.44 AM : गडचिरोली - गेल्या तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे. यंदा तब्बल पाचव्यांदा भामरागड तालुक्याचा संपूर्ण जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.
- 9.36 AM : पुणे - पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण पुन्हा शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून ६ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
- 9.00 AM : मुंबई - मुसळधार पावसामुळे गणेशोत्सव काळात सुरू असलेल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
- 8.30 AM : मुंबई - मंगळवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
आज.. आत्ता.. पावसामुळे मुंबईत चक्का जाम... बहुतांश रेल्वे सेवा ठप्प, चाकरमान्यांचे हाल
झरझर नजर...दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर
आज...आत्ता...

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 4, 2019, 7:46 PM IST