- 11.10 PM - भाजपात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. एकाचे दोन होवोत, दोनाचे चार होवोत येऊ द्या, आम्हाला पक्षाचं कुटुंबनियोजन करायचं नाही - रावसाहेब दानवे
- १०.०५PM महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात, पाच कार्याध्यक्षांचीही नियुक्ती
- 09.10 PM आता अलाहाबाद बँकेचीही फसवणूक; भूषण पॉवर आणि स्टीलकडून बँकेला १,७७५ कोटींचा चुना
- 08.50 PM आसाम - आसाममधील माजुली येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये घुसले पाणी
- 08. 10 PM अकोला : नापास होण्याच्या भीतीने पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
- ०८.०० PM - सेरेना विल्यम्सला हरवून सिमोना हालेप विम्बल्डन महिला एकेरीची विजेती
- ०७.३० PM - कोस्टल रोड प्रकल्पासाठी खणलेल्या खड्ड्यात पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू
-
०७.२० PM - आसाममध्ये पावसाचा हाहाकार.. बळींचा आकडा ६ वर, २५ जिल्ह्यातील जवळपास १५ लाख लोक विस्थापित
-
०७.१० -PM चिखलदराच्या सहलीवरुन येताना पर्यटकांच्या वाहनाला भीषण अपघात; एकाचा मृत्यू; ४ जण गंभीर
-
०७.०५ -PM - ज्यांना सेना-भाजपमध्ये जायचे आहे ते जातील, कोण फुटणार आहेत त्यांची नावे सांगा - अजित पवारांचे विखेंना आव्हान
-
सायंकाळी - ०७.०० PM - गटारात वाहून गेलेल्या दिव्यांशसाठी संतप्त नागरिक रस्त्यावर, महापौरांच्या राजीनाम्याची मागणी.
-
सायंकाळी ०६.५० - नागपूर : हिंगणा बायपासवर एसटीची कंनेनरला धडक, चालकासह २३ प्रवासी जखमी
- सायंकाळी ०६.३० - नवी मुंबईत शिवसेना नगरसेवकाने दुसऱ्या नगरसेवकाच्या लगावली श्रीमुखात
- सायंकाळी ०६.२० - उद्धव ठाकरेंचा पीक विमा विरोधातील मोर्चा होणार नाही; सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा विश्वास
- सायंकाळी ०५.१० - पश्चिम बंगालमधील सीपीएम, काँग्रेस व तृणमूलचे १०७ आमदार भाजपच्या संपर्कात - मुकूल रॉय
- सायंकाळी ०५.०२ -कर्नाटकमधील राजकीय घडामोडी तेज.. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आज सायंकाळी बंगळुरूला जाणार, उद्यापर्यंत थांबणार
---------------
- दुपारी ०४.४० कर्नाटकातील आणखी पाच आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव, अविश्वास प्रस्तावासाठी येडियुरप्पा तयार
- दुपारी ०४.३२ मुंबईतील वाडिया रुग्णालयात आग, सुदैवाने जीवितहानी नाही
- दुपारी ०४.०३ - केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात फेसबुकला ५०० अब्ज डॉलर (३ हजार ५०० कोटी रुपये) चा दंड.
- दुपारी ०३.२७ - गोवा काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेल्या आमदारांचा शपथविधी सोहळा सुरू
- दुपारी ०३.०५ - काँग्रेसकडून कॉस्ट कटिंग; अनेक विभागांना खर्च कमी करण्याच्या सूचना
दुपारी 2.50 - अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात कुकाणा येथे नवजात जिवंत मुलीचे अर्भक फेकून दिलेल्या अवस्थेत सापडले आहे. ही घटना नेवासा तलुक्यातील देवगाव परिसरात रो हाऊसच्या पाठीमागे साडेसहाच्या दरम्यान निदर्शनास आली.
दुपारी 2.45 - डोक्याला चेंडू लागून भारतीय फलंदाजाचा मृत्यू!
काश्मिर - काही वर्षांपूर्वी क्रिकेटविश्वाला हादरा बसला होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्यूजेसचा डोक्याला चेंडू लागून मृत्यू झाला होता. आता तशाच प्रकारची एक दु:खद बातमी समोर आली आहे. काश्मीरमध्ये एका चालू सामन्यात डोक्याला चेंडू लागून भारतीय फलंदाजाचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर
दुपारी 2.40 - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर स्पाईस जेटने प्रवास करणाऱ्या 130 प्रवाशांचा गेल्या 16 तासापासून खोळंबा झाला आहे.
दुपारी 2.30 - एसबीआयच्या एमडी अंशुला कांत यांची वर्ल्ड बँक ग्रुपच्या मुख्य वित्तीय अधिकारी पदी निुयक्ती
वॉशिंग्टन /नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक अंशुला कांत यांची जागतिक बँक गटाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड झाली आहे. याचबरोबर ते जागतिक बँक गटाचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून काम करणार आहेत. जागतिक बँक गटाचे अध्यक्ष डेव्हिड मॅलपास यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. कांत यांनी यापूर्वी मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून एसबीआयसाठी काम केले आहे. वाचा सविस्तर
दुपारी 1.25 - कर्नाटक वॉर - काँग्रेस नेते डी.के शिवकुमार यांनी राजीनामा दिलेल्या काँग्रेस आमदार नागराज यांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिवकुमार यांनी नागराज हे आपल्यासोबत असल्याचे सांगितले.
दुपारी 12.45 शिर्डी - कर्नाटकच्या बंडखोर आमदारांविरुद्ध युवक काँग्रेसची शिर्डीत जोरदार निदर्शने; निषेधाच्या दिल्या घोषणा
दुपारी 12.40 शिर्डी - कर्नाटकचे बंडखोर आमदार शिर्डीत पोहोचले; कडेकोट बंदोबस्तासह साई दर्शनासाठी रवाना; माध्यमांनाही मज्जाव
दुपारी 12.25 यवतमाळ- सर्पदंशांनंतर वेळेत मिळाला नाही उपचार; यवतमाळमध्ये ३ वर्षाच्या चिमुकलीचा करूण अंत वाचा सविस्तर
दुपारी 12.10 पणजी - गोवा विधानसभा: काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या १० पैकी ४ आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी, तर ४ मंत्र्यांना डच्चू वाचा सविस्तर
सकाळी 11.55 रत्नागिरी रिफानयरी प्रकल्पासाठी समर्थक एकवटले; प्रकल्प रत्नागिरीतच करण्याची मागणी; २० जुलैला काढणार मोर्चा
सकाळी 11.40 नवी मुंबई - तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावात तीन कामगारांची हत्या; भंगाराच्या गोदामात करत होते काम वाचा सविस्तर
सकाळी 11.25 - पुण्यात भाजपच्या महिला नगरसेविकेचा विनयभंग; जीव मारण्याचाही प्रयत्न वाचा सविस्तर
सकाळी 11.25 औरंगाबाद - खळबळजनक..! औरंगाबादेत चोरट्यांनी चक्क एटीएम मशिनच पळविले; २५ लाख लंपास वाचा सविस्तर
सकाळी 11.10 : सिंधुदुर्ग - महामार्ग ठेकेदाराच्या ऑफिस आणि यंत्रसामुग्रीची अज्ञातांकडून तोडफोड..कासार्डे येथे पहाटे झाली तोडफोड.. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कणकवली पोलीस स्थानकात सुरु...स्वाभिमान कार्यकर्त्यांकडून तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती...
सकाळी 9.15 - शिर्डी जवळच्या निमगाव विजयनगर येथे कोयत्याने वार करून तिघांची हत्या करण्यात आली आहे. या तिहेरी हत्याकांडात दोघेजण जखमीही झाले आहेत.वाचा सविस्तर
सकाळी 8.20 - अज्ञाताने कोथिंबिरीवर फवारले तणनाशक, बहरलेले पीक करपले
उस्मानाबाद - आस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतकऱ्याची आधीच दयनीय अवस्था झाली आहे. यात आता एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात दुसऱ्याच्या शेतात आलेले चांगले पीक नष्ट करण्यापर्यंत अनेकांची मजल जात आहे. जिल्ह्यातील अनसुर्डा येथील शहाजी गायकवाड या शेतकऱ्याच्या शेतात अज्ञात व्यक्तीने कोथिंबिरीच्या पिकावर तणनाशक फवारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे कोथिंबिरीच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त
सकाळी 8.18 - लातुरात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
लातूर - सततच्या नापिकीला कंटाळून औसा तालुक्यातील जवळगा येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे नातवांची लग्न करायची कशी, या विवंचनेतून नागोराव बनसोडे या वद्ध शेतकऱ्याने (वय ६०) विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. सविस्तर वृत्त
सकाळी 8.15 वर्धा - जिल्ह्यातील पूलगाव येथे तलवारीने वार करून तरुणाची निर्घृण हत्या
सकाळी 7.30 औरंंगाबाद - वैजापूरमध्ये काळवीट शिकार प्रकरणी २ जण ताब्यात; ३ जण पळाले
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्ये अवैधरित्या काळवीटाची शिकार करणाऱ्या २जणांना अटक केली आहे. या कारवाईवेळी इतर ३ आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली आहे.