वर्षानुवर्षे काँग्रेसच्या छायेत मीठ खाणारेच 'याला' जबाबदार; 'सामना'तून शिवसेनेची टीका
मुंबई - काँग्रेसकडून सुरू असलेल्या राजीनामा सत्रावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. काँग्रेसच्या ऱ्हासाला नेहरू-गांधी परिवार जबाबदार नाही, तर ज्यांनी वर्षानुवर्षे काँग्रेसचे मीठ खाल्ले असे सर्वच लोक जबाबदार आहेत. ज्या काँग्रेसला एक महिन्यानंतरही स्वतःचा अध्यक्ष निवडता येत नाही, त्या काँग्रेसने आता कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरी बसावे, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. अधिक वाचा
IND vs NZ : पावसाने फेरले खेळावर 'पाणी', उर्वरित सामना आज
मँचेस्टर - भारत-न्यूझीलंडदरम्यानची वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य लढत रंगतदार अवस्थेत असताना पावसाचे आगमन झाले. या वेळी भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून न्यूझीलंडला 46.1 षटकांत 5 बाद 211 धावांत रोखले होते. यानंतर रात्री उशिरापर्यंत लढत सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे मंगळवारचा खेळ स्थगित करून उर्वरित खेळ राखीव दिवशी म्हणजे आज होणार असल्याचे पंचांनी जाहीर केले. अधिक वाचा
कर्नाटक वॉर : बंडखोर आमदार 'रेनिसन्स'मध्ये, हॉटेलबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त
मुंबई - मुंबईमधील रेनिसन्स हॉटलबाहेर महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल आणि दंगल नियंत्रण पथकाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रेनिसन्स हॉटेलमध्ये थांबलेल्या कर्नाटकातील काँग्रेसच्या 10 बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी येथील सुरक्षा वाढवली आहे. दरम्यान, कर्नाटकचे मंत्री डी.के. शिवकुमार यांच्या भेटीपूर्वी सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी या आमदारांनी केली होती. अधिक वाचा
नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच संघाचा थेट अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता या मुद्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अधिक वाचा
पालघरमध्ये निकृष्ट बांधकामामुळे ८० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी कोसळली
पालघर - '२६ गाव पाणीपुरवठा योजने'अंतर्गत बांधण्यात आलेली ८० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी निकृष्ट बांधकामामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. माहीम ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या हरणवाडी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी ही टाकी बांधण्यात आली होती. मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही टाकी कोसळली. अधिक वाचा