६.३० - भाजप 'हाऊसफुल'; आता भरती नाही - मुख्यमंत्री फडणवीस
अमरावती - भाजपमध्ये गेल्या काही दिवसांत इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांचा ओघ सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जागा फुल्ल झाल्या असून आता भरती नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. अधिक वाचा..
५.३० - सध्या राजकीय स्थित्यंतराचा काळ आहे - अमोल कोल्हे
पुणे - राष्ट्रवादीतून बाहेर पडणाऱ्या लोकांमुळे उलट पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये वेगळी जिद्द निर्माण झाली आहे. राजकारणात 20 पंचवीस वर्षांनी स्थित्यंतर होत असते, सध्याचा काळ स्थित्यंतराचा आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे. अधिक वाचा..
५.०० - पिचड यांच्या भाजप प्रवेशामुळे महादेव कोळी समाज नाराज - अनंत तरे
ठाणे - मधुकर पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी महादेव कोळी समाज मात्र नाराज झाला आहे. असे वक्तव्य शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी केले आहे. अधिक वाचा..
४.०० - तीन तलाकला राष्ट्रावादीचा विरोधच, शरद पवारांनी सांगितले राज्यसभेतील गैरहजेरीचे कारण
सातारा - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता जागा वाटपाच्या जवळपास पोहचली आहे. या वेळी अमोल कोल्हे आणि बाकी तरुण सहकाऱ्यांना निवडणूक प्रचारात उतरवणार आहोत. अधिक वाचा..
३.२० - संततधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 बंद होण्याची शक्यता
नंदुरबार - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नवापूर ते कोंडाईबारी घाटा दरम्यान रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. यामुळे या रस्त्यावर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अधिक वाचा...
३.०० - सानिया मिर्झा मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा मैदानात उतरणार
नवी दिल्ली - भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा पुन्हा टेनिसच्या मैदानात उतरणार आहे. आई झाल्यानंतर सानिया मागील काही काळापासून टेनिसपासून लांब होती. अधिक वाचा..
२.४० - भाजपच्या 'महाजनादेश' यात्रेला सुरुवात; राजनाथ सिंह, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित
अमरावती - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान काढण्यात येत असलेल्या या यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात आज अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळ असलेल्या गुरुकुंज मोझरी येथून झाली आहे. अधिक वाचा..
२.३० - प्रतिष्ठेच्या अॅशेज मालिकेला आजपासून सुरुवात
लंडन - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये आजपासून ऐतिहासिक अॅशेस मालिकेला सुरुवात होणार आहे. अॅशेज मालिका दोन्ही संघासाठी प्रतिष्ठेची मानली जाते. आज बर्मिंगहॅम येथे अॅशेस मलिकेतील पहिल्या कसोटी सामना खेळला जाणार आहे. अधिक वाचा..
२.२० - जालना जिल्ह्यातील तरुणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार; पीडितेचा जीवन–मृत्युशी संघर्ष
औरंगाबाद - मुंबई शहरात आपल्या भावाकडे राहायला गेलेल्या 19 वर्षीय तरुणीवर चार जणांनी पाशवी बलात्कार केल्याने पीडिता गंभीर जखमी झाली आहे. घाटी रुग्णालयात तिचा जीवन-मृत्यूशी संघर्ष चालू आहे. अधिक वाचा..
२.०० - दुष्काळी भागातील १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी होणार माफ
मुंबई - दुष्काळी भागातील १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करताना यापूर्वी माफ न होणारी प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी आता माफ होणार आहे. अधिक वाचा..
१.३० - दिया मिर्झाने साहिलसोबतची ११ वर्षांची रिलेशनशिप-पाच वर्षांची लग्नगाठ सोडली, सोशल मीडियावर केले 'असे' आवाहन
मुंबई - अभिनेत्री दिया मिर्झा आणि साहिल संघा यांनी पाच वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. तर ११ वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. अशात आता दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अधिक वाचा..
१.०० - सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात नितीन गडकरींना आली भोवळ
सोलापूर - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज (गुरुवार) सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १५ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते. अधिक वाचा..
१२.३० - उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण : भाजप आमदार कुलदीप सेंगरची पक्षातून हकालपट्टी
नवी दिल्ली - उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला आमदार कुलदीप सिंह सेंगरची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. अधिक वाचा...
११.३० - वडोदऱ्यात पूर परिस्थिती, महाराष्ट्र - गुजरात मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द
११.२५ - B'day Spl: मीना कुमारीसमोर सुपरस्टारही विसरायचे डायलॉग, दारूमुळे गमवावे लागले प्राण
११.१५ - दिल्लीतील 'आरएमएल' रुग्णालयाला मिळणार वाजपेयींचे नाव
११.०० - B'day Spl: जाणून घ्या, बर्थडे गर्ल तापसी पन्नूबद्दलच्या या खास गोष्टी
११.०० - भाजपच्या महाजनादेश यात्रेची तयारी अंतिम टप्यात; 1 वाजता होणार प्रारंभ
१०.३० - पीक विम्याच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी गावोगावी शिबिरे घ्या - अशोक चव्हाण
१०.१५ - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सहा दिवस जोरदार पाऊस, धरणात 76.7 टीएमसी पाणीसाठा
१०.०० - कोल्हापुरात पावसाचे थैमान; राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले
९.३० - मुंबई विद्यापीठाच्या 'आयडॉल'ला युजीसीची मान्यता; 35 ते 40 हजार विद्यार्थांना दिलासा
९.०० - साताऱ्याची जागा निश्चित राखू, शिवेंद्रराजे गेल्यामुळे पक्षाला फरक पडणार नाही - शरद पवार
८.४५ - गोसे धरणाची 33 पैकी 17 दारे उघडली; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
८.३० - राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर उत्तर नगरमध्ये राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात