10.22 PM - कोल्हापुरात आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
- पुणे जिल्ह्यातील ३ तालुक्यातील तर सांगली जिल्ह्यातील ५ तालुक्यातीलही शाळा व महाविद्यालयांना सुटटी जाहिर करण्यात आली आहे.
8.00 PM - पाकिस्तानने भारतीय राजदुतांना इस्लामाबाद सोडणण्याचे दिले आदेश.
- भारतासोबतचा द्विपक्षीय व्यापारही बंद. काश्मीर प्रश्नी सर्वोच्च सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशीची घोषणा.
7.00 PM - पुणे - राज्यात पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर, सोलापुरातील सर्व धरणे १०० टक्के भरली. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कृष्णा, पंचगंगा, कोयना, वारणा, मुळा मुठा, भीमा या नद्यांना महापूर आला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती गंभीर झाल्याने प्रशासनाने कोल्हापुरात ६ एनडीआरफच्यास तैनात केल्या आहेत, आणखी ६ तुकड्या दाखल होणार आहेत. तसेच सांगलीत ३ आणि सातारामध्ये १ एनडीआरएफची तुकडी दाखल तैनात करण्यात आली आहे. जवळपास ८९ बोटींच्या सहाय्याने नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे कार्य सुरू आहे.
6.55 PM कोल्हापूर - आंबा घाटातील रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक 20 तासानंतरही बंदच
6.50 PM - मुंबई - विरोधकांनी पुराचे राजकारण करू नये, स्थिती गंभीर - चंद्रकांत पाटील
6.45 PM पुणे - महापूराचे थैमान..! पुणे विभागात आतापर्यंत पावसाचे 16 बळी; सर्वाधिक बळी सातारा जिल्ह्यात
6.30 PM - ंमुंबई - राज्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा, बाळासाहेब थोरातांची मागणी
6.15 PM - अमरावती - पावसामुळे हमसफर एक्सप्रेसचा मार्ग बदलला, पुण्याला जाणारे प्रवाशी पोहोचले बडनेराला
6.00 PM सोलापूर - भीमेच्या पुराने पंढरपूरचा संपर्क तुटला; कर्नाटकचे भाविकही अडकले
5.30 PM - सोलापूर - पंढरपुरातही पूर स्थिती, सोलापूरसह मराठवाड्याशी संपर्क तुटला
4.30 PM - माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज अनंतात विलीन
3:29 PM पुणे - मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू.. सर्वाधिक सातारा जिल्ह्यातील - विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर
पुणे-4, सातारा-7, सांगली-2, सोलापूर-1, कोल्हापूर-2,
विभागात 137 टक्के पाऊस, 58 तालुक्यापैकी 30 तालुक्यात अतिवृष्टी झाली,
सातारा, सांगली आणि कोल्हापूर पुढील तीन दिवस अतिवृष्टी इशारा आहे, भीमा खोरा परिस्थिती सुधारली आहे
पाणीपुरवठा कोल्हापूर 390 गावांच्या पाणीपुवठा बंद, सातारा 91 गावांचा पाणी पुरवठा बंद असून त्या पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरु आहेत, वैद्यकीय पथक काम करत आहेत
पुणे विभागात एकूण 1,32,360 लोकांना स्थलांतरित केलं असून अजून संख्या वाढत आहे
2:59 PM कोल्हापूर - एअरफोर्सच्या विशेष विमानाने नौदलाचे प्रशिक्षित पाणबुडे कोल्हापूरला रवाना, खासदार संभाजीराजेही सोबत
2:49 PM - घरातील व्यक्ती गमावल्याने कधीही न भरून येणार नुकसान झालंय- अन्सारी कुटुंबीय
2:43 PM नाशिक - अजित पवार आणि गिरीश महाजन यांचा वाद सुरू
-अजित पवार यांचे अपमानास्पद बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यानी जाळले, गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी,
अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य करणारे बॅनर भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी लावले होते
2:05 राज्यात पूरपरिस्थिती बिकट आहे. अतिगंभीर परिस्थितीमध्ये संकटामधील लोकांना प्रथम बाहेर काढले पाहिजे. आपले मुख्यमंत्री राजकीय कामात गुंतले होते. उशिरा का होईना मुख्यमंत्री कामाला लागलेत ही चांगली गोष्ट आहे - शरद पवार
2:09 जालना - सचिवाने विनयभंग केल्याची शिक्षिकेची तक्रार.... डॉक्टर फ्रिजर बॉईज शाळेतील प्रकार
2:11 बिहारमध्ये अशी पूर परिस्थिती होते. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी परिस्थिती दिसत आहे.... पूरग्रस्तांना तातडीने मदत केली पाहिजे... पाऊस आता थांबत आहे.... राज्य सरकारकडून मदतकार्यात उशीर झाला.... आपत्तीग्रस्त परिस्थितीमध्ये योग्य वेळी लक्ष दिले असते, तर कदाचित नुकसान कमी झाले असते - शरद पवार
12.26 - ३७० कलम दुरुस्तीनंतर महाराष्ट्र पर्यटन महामंडळ काश्मीर, लेह लडाखमध्ये गुंतवणूक करणार... रिसॉर्ट आणि हॉस्पिलिटी इंडस्ट्री उभारणार : पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा
12.23 - रत्नागिरी - जिल्ह्यात दुधाचा तुटवडा.. पश्चिम महाराष्ट्रातील पूर तसेच आंबा घाटातील रस्ता बंदचा फटका...जिल्ह्यात दररोज 60 ते 70 हजार लिटर दुधाची गरज....दूध तुटवड्यामुळे अनेकांचे हाल
कोल्हापूर - 204 गावातून 11 हजार 432 कुटुंबांतील 51 हजार 785 व्यक्तींचे स्थलांतर.... नौसेनेच्या दोन विमानातून 22 जणांचे पथक गोवा कोस्टगार्डचे हेलीकॉप्टर एअरलिफ्टींगसाठी दाखल -जिल्हाधिकारी दौलत देसाई
12:03 - आरबीआयकडून रिझर्व रेपो रेट 5.15 टक्के व बँक रेट 5.65 टक्के करण्यात आला.
12:05 सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार... अंत्यसंस्कारासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
11:58 मी योग्य वेळी पूरग्रस्त भागाला भेट देईन.. पंचनाम्याचे आदेश दिलेत...धरणातून विक्रमी विसर्ग झाला. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली...मदतीचे निकष बदलून वाढीव मदत दिली जाईल - मुख्यमंत्री
11:49 पूर परिस्थितीबाबत उच्चस्तरीय बैठक झाली. कोल्हापूरची परिस्थिती बिकट आहे.... सरासरी पेक्षा जास्त पाऊस झालाय... अलमट्टीबाबत कर्नाटक मुख्यमंत्र्यांशी बोललोय... मदत कार्य जोरात सुरु आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11:54 - कोल्हापूर अपडेट - राधानगरी धरणाचे सर्वच स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत.... जवळपास प्रतिसेकंद 11 हजार क्युसेकचा होणारा विसर्ग कमी झाला....
11:54 - मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथून हत्या आणि लूट करून पाळालेल्या 3 आरोपींना कळमना पोलिसांनी केली अटक
8:14 कोल्हापूर-सांगली पुरासंदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री मुंबईत... सह्याद्रीवर तातडीची बैठक सुरू
11:25 नागपूर - कदाचित देवाने स्वर्गात परराष्ट्र मंत्रालय सुरू केले असावे, आणि सुषमा स्वराज यांनी तेथे नेमणूक केली असावी- राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेंढे यांची भावनिक प्रतिक्रिया
11:27 - सुषमा स्वराज म्हणजे भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. विचारधारा वेगळ्या असल्या तरी प्रत्येकाशी जुळवून घेण्याची त्यांची वृत्ती कायम लक्षात राहील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सुषमाजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन - राज ठाकरे
11.18 रत्नागिरी - पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा फटका रत्नागिरीकरांना...पेट्रोल-डिझेल घेऊन येणाऱ्या गाड्या मध्येच अडकल्या... इंधनाच्या गाड्या अडकल्याने रत्नागिरीत पेट्रोल टंचाई...इंधन असलेल्या पेट्रोल पंपावर एक ते दिड किलोमीटर पर्यंत रांगा... रत्नागिरी शहराला ३० ते ३५ हजार लिटरची दिवसाला आवश्यकता...दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या गाड्या आल्याच नाहीत...
11.13 - गोव्याला विशेष दर्जा हवा असे आजच्या स्थितीत वाटत नाही. कारण गोव्याला जे हवे ते भाजप सरकारने दिले आहे - मुख्यमंत्री प्रमोद सावंत
11.10 - महापुराचा कोल्हापुरातील पेट्रोल पंपांना फटका ; बहुतांश सर्वच पेट्रोल पंप बंद
कोल्हापुरातील महापुराचा फटका आता वाहनचालकांना बसताना पाहायला मिळत आहे... कोल्हापुरातील सर्वच पेट्रोल पंप सध्या बंद अवस्थेत पाहायला मिळत आहेत...पुणे-बंगळुरू महामार्गावर सांगली फाटा या ठिकाणी पाच ते सहा फूट इतके पाणी आल्यामुळे हा महामार्ग पूर्णपणे बंद आहे.
11.05 - कोल्हापूर - लष्कर आणि NDRF चे जवान बचावकार्यासाठी रवाना; आंबेवाडी आणि चिखली गावात अनेक लोक अद्याप अडकले.... महापुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या कामाला गती आली आहे...106 जवानांचे लष्कर आणि एनडीआरएफ पथक कोल्हापुरात दाखल. सविस्तर बातमी
10.53 - सांगलीत पुराचा महाप्रलय, 70 हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर, 2005 च्या महापुराचा रेकॉर्ड ब्रेक...
सांगली जिल्ह्यात सध्या महापुराने थैमान घातले आहे. वारणा आणि कृष्णाकाठच्या शंभरहून अधिक गावांना महापुराचा विळखा पडला आहे. त्यामुळे जवळपास नदीकाठच्या 70 हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पूर परिस्थिती पाहता या ठिकाणी आता लष्कराला सुद्धा पाचारण करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त
10.18 - सातारा कास रस्ता खचला, वाहतूक बंद
आज सकाळी कासनजीक असलेल्या अटाळी गावानजीक हॉटेल हेरिटेजवाडीजवळ असलेला सातारा-कास रस्ता खचला असून वाहतूक धोकादायक झाल्याने रस्ता सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे. सविस्तर बातमी
10.17 पुणे - व्हॉटसपवर वादग्रस्त पोष्ट टाकल्याने शिरुरमधील एका राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल.
8.05 - नौदलाचे विमान बचावकार्यासाठी कोल्हापुरात दाखल होण्यासाठी गोव्यातून निघाल्याची माहिती
7.30 कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा हाहाकार; एनडीआरएफसह लष्कराचे पथक दाखल
106 जणांचे पथक कोल्हापुरात पोहचले... जिल्ह्यातील विशेषत: प्रयाग चिखली या पूरग्रस्त भागात स्थलांतरास सुरुवात होणार...खराब वातावरणामुळे नेव्हीचे विमान आणि गोवा कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर कोल्हापूरमध्ये पोहचू शकले नाही...हे हेलिकॉप्टरही एअरलिफ्टींगसाठी आज कोल्हापूरमध्ये दाखल होईल...महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे या दोन्ही पथकांना पुढे कोल्हापुरात पोहोचता आले नाही...सध्या बोट तयार करून हे पथक कोल्हापूरकडे बाचावकार्यासाठी थोड्याच वेळात रवाना होत आहे...
7.20 सांगली - कृष्णेच्या महापुराने सांगली जलमय... कृष्णा नदीने 54 फुटांची गाठली पातळी.... 2005 मधल्या महापुराचा तुटला रेकॉर्ड 53.9 फूट पातळी होती 2005 च्या महापुरात... शहरातील मुख्य बाजार पेठ,पालिकेला पाण्याचा वेढा... खाणभागच्या शेवाळी गल्ली,स्टेशन रोड पाण्याखाली... सांगलीतील पूरस्थिती बनली गंभीर... नदी काठच्या 50 हजारहुन अधिक नागरिकांचे स्थलांतर.....वारणा आणि कृष्णाकाठच्या 107 गावांना पुराचा वेढा... 100 गावातील विद्युत, पाणी पुरवठा बंद...