ETV Bharat / state

Aaditya Thackeray BMC Election : आदित्य ठाकरेंची राजकीय परिपक्वता 'किंगमेकर' ठरणार? बीएमसी निवडणुकीसाठी विशेष रणनीती - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई महापालिका देशातील सर्वात मोठी महापालिका म्हणून गणली जाते. शिवसेनेने आजवर येथे आपले वर्चस्व टीकवून ठेवले आहे. गेल्या २५ वर्षापासून सेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका खेचून आणण्यासाठी भाजपने सध्या जोर लावला आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी परप्रांतीय नेत्यांच्या भेटी - गाठी ठाकरेंनी वाढवल्या आहेत. ठाकरेंची ही राजकीय परिपक्वता किंगमेकर ठरणार असल्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

Aaditya Thackeray In BMC Election
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Feb 12, 2023, 10:05 PM IST

मुंबई : केंद्रात, राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने मुंबई महापालिकेकडे मोर्चा वळवला. शिवसेनेतील फुटीचा फायदा घेण्याची रणनिती आखली आहे. भाजपला मुंबईत जोरदार टक्कर देण्याची तयारी आदित्य ठाकरेंनी केली आहे. या पार्श्वभूमीवर परप्रांतीय नेत्यांच्या भेटी - गाठी ठाकरेंनी वाढवल्या आहेत. ठाकरेंची ही राजकीय परिपक्वता किंगमेकर ठरणार असा तर्क राजकीय तज्ज्ञांकडून लावला जात आहे.

आदित्य ठाकरेंची विशेष रणनिती : मुंबई महापालिका देशातील सर्वात मोठी महापालिका म्हणून गणली जाते. शिवसेनेने आजवर येथे आपले वर्चस्व टीकवून ठेवले आहे. गेल्या २५ वर्षापासून सेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका खेचून आणण्यासाठी भाजपने सध्या जोर लावला आहे. भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. सुमारे 3 कोटी 29 लाख इतकी लोकसंख्या वास्तव्य करतात. मराठी भाषिकांच्या तुलनेत हिंदी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. भाजपने ही मते डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत आहे. सेनेच्या बालेकिल्ल्यात प्राबल्य वाढवण्याची रणनीती आखली आहे. सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत पडलेली फूट देखील भाजपच्या कारस्थानाचा भाग आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेत फूट पडली असली तरी, भाजपला काटें की टक्कर देण्यासाठी आदित्य ठाकरेंनी कंबर कसली आहे.

मतांचे विभाजनाचे व्हीजन : शिवसेनेने आजवर मराठी भाषिकांच्या मुद्दयावर राजकारण केले. मराठी मतदारांनी ही शिवसेना, मनसेला भरभरुन साथ दिली. तर गुजराती, मारवाडी मतदार नेहमीच भाजपला पाठिंबा देत आले आहेत. उत्तर भारतीय मतदार हे यापूर्वी बसपा आणि काँग्रेसकडे जात होते. मात्र, हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे ते देखील भाजपकडे वळले आहेत. मुंबईत मतांचा टक्का अधिक आहे. त्या मतांवर आदित्य ठाकरे यांचे लक्ष आहे. ही मते आपल्या वळवण्यासाठी त्यांनी परप्रांतीय नेत्यांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे.

राजकीय परिपक्वता किंगमेकर ठरणार : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांची यापूर्वी भेट घेतली होती. आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ही राजकीय भेट नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आगामी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांचे ध्रुवीकरण करण्याचा ठाकरेंचा हा प्रयत्न आहे, असे बोलले जाते. आदित्य ठाकरेंची हीच राजकीय परिपक्वता किंगमेकर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पक्षांना संघटित करण्यावर भर : बिगर-भाजपशासित राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या एकजुटीचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे स्टॅलिन, तेलंगणचे चंद्रशेखर राव या प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची एकजूट झाली आहे. महाविकास आघाडी सरकार असताना, तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. दरम्यान, ममता बॅनर्जी आणि चंद्रशेखर राव या दोन मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसशी फारसे जमत नाही. केरळचे मुख्यमंत्री विजयन हे भाजपच्या विरोधात असले तरी त्यांना अजून या आघाडीत सहभागी झालेले नव्हते. ही मोर्चेबांधणी कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरु असताना, भाजपने महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेनेत फूट पाडत सत्ता स्थापन केली. प्रादेशिक पक्ष संपवायला निघालेल्या भाजपविरोधात समविचारी पक्षांना संघटित करण्यावर भर दिला आहे. मुंबई मनपाच्या निवडणुकीत त्याचा फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार-अखिलेश यादव भेट : बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांची सत्ता होती. भाजपने त्यांची कोंडी केली. नितीश कुमार यांनी भाजपला रामराम करत, जेडीयूचे नेते अखिलेश यादव यांच्या सोबत सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेना प्रमाणे नितीश कुमार संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा प्रयोगाच्या धर्तीवर नितीश कुमार यांनी अखिलेश यादव यांच्यासोबत युती करत भाजपला धडा शिकवला. मुंबईत देखील भाजपला आस्मान दाखवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी नितीश कुमार, अखिलेश यादव यांची भेट घेत, नव्या समीकरणाचे संकेत दिले. बिहारमधील मोठ्या संख्येने लोक मुंबईत वास्तव्य करतात. विशेषतः नितीश कुमार, अखिलेश यादव यांना मानणारा हा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भाजपला मुंबई मनपा निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी जवळीक वाढवली आहे.

आगामी काळात सुगीचे दिवस : शिवसेनेतील फुटीनंतर आदित्य ठाकरे यांनी नेतृत्व स्वीकारले आहे. युवा नेतृत्व असून त्यांच्याकडून तरुणांच्या अपेक्षा आहेत. भाजपला शह देण्याची धमक आदित्य ठाकरे दाखवत आहेत. मुंबई मनपा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील नेत्यांना संघटित करून मुंबईत त्यांचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न आहे. आदित्य ठाकरे यांची राजकीय परिपक्वता शिवसेनेला आगामी काळात सुगीचे दिवस आणेल, यात दुमत नाही असे मत वरिष्ठ पत्रकार श्रीरंग सुर्वे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : Uddhav Thackeray on BJP : आता भाजपला भारतीयांना उत्तर द्यावे लागेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वर्मी घाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.