ETV Bharat / state

'वऱ्हाड निघालं दावोसला'; दावोसला एवढी लोकं कशासाठी? आदित्य ठाकरेंचा सवाल - Davos Tour

Aaditya Thackeray On Davos Tour: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही सहकारी दावोसला जाणार आहेत. (Davos Tour) यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. (CM Shinde) दावोसला फक्त 5 ते 6 लोकं जाऊ शकतात. पण मुख्यमंत्री त्यांच्यासोबत 50 जणांना घेऊन जात असल्याचे आदित्य ठाकरे यांना खटकत आहे. यावर त्यांनी काय भाष्य केलं ते बघुया (MLA Aaditya Thackeray)

Aditya Thackeray On Davos Tour
आदित्य ठाकरेंचा सवाल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 4:54 PM IST

दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करताना

मुंबई Aaditya Thackeray On Davos Tour : युवासेनाप्रमुख आणि शिवसेना (ठाकरे गटाचे) आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत, राज्य सरकारच्या दावोस दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला. (BJP on Davos Tour) मागच्यावेळी या सरकारने दावोसमध्ये किती एमओयूवर सही केली, (Ministry of External Affairs) हा संशोधनाचा विषय आहे. परंतु, यावेळी दावोस दौऱ्यासाठी एवढेजण कशासाठी जात आहेत? तिकडे 50 खोके कशासाठी जात आहेत? असा आदित्य ठाकरेंनी सवाल करत सरकारवर टीकास्त्र डागले. (Ministry of Finance)

परवानगी मिळाली आहे का? दावोसला जाण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि वित्त मंत्रालय यांची परवानगी लागते. माझ्या माहितीप्रमाणे 50 मधून फक्त 10 लोकांना परवानगी मागितली होती. मग बाकीच्या लोकांची तुम्ही परवानगी मागितली होती का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. केंद्र सरकारचे देखील याकडे दुर्लक्ष आहे. यावेळी माझ्या भीतीमुळं त्यांनी खर्चावर नियंत्रण आणलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी चॉर्टड फ्लॅट घेतले नाही, अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यावर केली.

सु्ट्टीसाठी फिरायला चाललेत: पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रमध्ये सध्या वातावरण खूप गढूळ झालं आहे. दावोसला फक्त 5 ते 6 लोकं जाऊ शकतात. पण तिकडे सगळे जाताहेत. यामध्ये मंत्र्यांचे पीए, ओएसडी हे जाताहेत. एका उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडीपण तिकडे जाताहेत, अशी मला माहिती मिळाली आहे, असं ठाकरे म्हणाले. दोन-तीन दलाल पण जाताहेत. खरोखरचं काम करण्यासाठी जाताहेत की सुट्टी साजरी करायला, फिरायला जाताहेत हे कळायला मार्ग नाही, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंनी सरकारवर केली.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं: उगीच कुणी विचारत नाही म्हणून हे सगळे दावोसला घेऊन जाताहेत. माझा सवाल आहे एवढे पीए, ओएसडी का घेऊन जाताहेत? त्यांचं काय काम आहे? तिकडे 50 खोके चाललेत. 50 जणांमध्ये कितीजण व्यावसायिक आहेत, आमदार, खासदार, मंत्री किती आहेत हे माहीत पडले पाहिजे. मुख्यमंत्री कार्यालयमधून कितीजण जाताहेत याची माहिती द्यावी. रविवारी काही लोकं तिकडे गेलेत, सोमवारी (आज) आणि मंगळवारी (उद्या) पण तिकडे काहीजण जाणार आहेत. तिकडे जाऊन मुख्यमंत्री कोणा-कोणाला भेटणार आहेत, काय करणार आहेत? याची त्यांनी फोटोसकट माहिती द्यावी, जाहीर करावं असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की गुजरातचे? आमदार अपात्रटतेचा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात गेल्यामुळं त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावर केली आहे, असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारला असता मुख्यमंत्र्यांनी सर्व काही गुजरातला नेले आहे. बुलेट ट्रेनसाठी जागा दिली, वेदांता, एअर बससारखे प्रकल्प गुजरातला पाठवले. मुख्यमंत्र्यांनी हिरे बाजार पूर्ण गुजराला घेऊन गेले. क्रिकेट वर्ल्डकपची फायनल पण तिकडे घेऊन गेलेत. त्यामुळं प्रश्न हा पडतो की, हे घटनाबाह्य मुख्यमंत्री गुजरातचे आहेत की, महाराष्ट्राचे? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.

वऱ्हाड निघालंय दावोसला! 'वऱ्हाड निघालंय लंडनला' हे जसं नाटक आहे, यात लंडनला जाण्यासाठी सगळेच उत्सुक होते. तसं येथे 'वऱ्हाड निघालंय दावोसला...' असं नाटक चाललंय आहे. असा टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला. जे 10 ते 15 लोकं काम करू शकतात. तिथे 50 ते 70 लोकं घेऊन जाण्याची गरज काय? भाजपाची दावोस दौऱ्यावर काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट करावे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा:

  1. राज्यातील उत्तम गोष्टी हिसकावण्याचा प्रयत्न; परप्रांतियांविरोधात राज ठाकरे पुन्हा आक्रमक
  2. मकर संक्रांतीनिमित्त शिर्डीत आकर्षक सजावट, साई मंदिरात भाविकांची रीघ; पाहा व्हिडिओ
  3. शरद मोहोळ खून प्रकरणी गुंड विठ्ठल शेलारसह 6 जणांना अटक, गुन्हे शाखेची मोठी कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.