मुंबई : 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा वरळी येथे पदाधिकारी मेळावा पार पडला. यावेळी आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. 20 जून हा मिंधे गटाचा जागतिक खोके दिन आहे. 33 देशांनी या दिनाची नोंद घेतल्याचा घणाघात आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.
'मविआ'च्या काळात महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता' : आज जागतिक फादर्स डे आहे. राज्यात काही लोक दुसऱ्याच्या वडिलांना चोरून राजकीय करिअर करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केला. तसेच नुकतीच प्रसिध्द झालेल्या जाहिरातीचा त्यांनी धसका घेतला आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मविआ सरकारच्या काळात महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता. देशात पहिल्या तीन मुख्यमंत्र्यांच्या यादीत उध्दव ठाकरे होते. परदेशात सुध्दा मविआ सरकार कधी येणार, असा प्रश्न विचारला जात असल्याचे ठाकरेंनी सांगितले. तसेच गेल्या 25 वर्षात मनपाच्या माध्यमातून शिवसेनेने काय केले, अशी टीका होत आहे. परंतु आम्ही जास्तीत जास्त महिला नगरसेवक निवडून आणल्या आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याचे ते म्हणाले. गद्दारांना माझे थेट आव्हान आहे, त्यांनी त्यांच्या काळात केलेल्या कामांचे सादरीकरण करावे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
'मुंबईची लुट सुरु आहे' : आदित्य ठाकरेंनी यावेळी मुंबईत शिवसेनेने केलेल्या कामांची यादी गिरवली. तसेच मुंबईत जे चांगले करु शकलो ते महाराष्ट्रात देखील करायचे होते. मात्र सरकार पडल्याने ते शक्य झाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यापासून मुंबईची लुट सुरु आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. तसेच हे सरकार लवकरच पडणार असून आमचे सरकार आल्यावर सर्व प्रकरणांची चौकशी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यात मुंबई मनपाच्या तिजोरीतून लूट सुरु आहे. लवकरच निवडणुका जाहीर होतील. आपण निवडणुकांसाठी थांबलो आहे. फक्त एकदा निवडणुका लागू द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा :