ETV Bharat / state

मुंबई परिसरात कोरोनाचे एकूण १६ रुग्ण, एकाचा मृत्यू

कस्तुरबा रुग्णालयात आज 511 बाह्य रुग्णांची तपासणी करण्यात आली. सध्या 67 संशयित रुग्ण कस्तुरबामध्ये भरती आहेत. आजच्या दिवसभरात एका रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर 76 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कस्तुरबा रुग्णालयात सध्या 74 रुग्ण भरती आहेत. सेव्हन हिल रुग्णालयात 10 तर मिराज हॉटेलमध्ये 10 असे एकूण 20 आंतरराष्ट्रीय प्रवाशांना होम क्वारेंटाईन करून ठेवण्यात आले आहे, असे शाह यांनी सांगितले.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Mar 18, 2020, 8:55 PM IST

Updated : Mar 18, 2020, 9:42 PM IST

मुंबई - जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोनाचा मुंबईत आणखी एक आज रुग्ण आढळला. यामुळे 23 जानेवारी पासून आतापर्यंत मुंबई आणि मुंबई बाहेरील कोरोनाच्या 16 रुग्णांची नोंद महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात झाली आहे. त्यापैकी एकाचा काल मृत्यू झाला असल्याने सध्या मुंबईमधील 7 आणि मुंबई बाहेरील 8 अशा एकूण १५ रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

माहिती देताना डॉ. दक्षा शाह

मुंबईमधील कोरोनाबाबत महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या मेडिकल बुलेटिनवेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना दोन दिवसांपूर्वी अमेरिकेला जाऊन आलेल्या एका 49 वर्षीय रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्याच्या जवळच्या लोकांची माहिती घेऊन त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये एका 68 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे आज समोर आले आहे. ही महिला अमेरिकेहून आलेल्या कोरोनाग्रस्त महिलेच्या सतत संपर्कात होती. या महिलेने आंतरराष्ट्रीय प्रवास केला नव्हता, असे दक्षा शाह यांनी सांगितले.

कस्तुरबा रुग्णालयात आज 511 बाह्य रुग्णांची तपासणी करण्यात आली. सध्या 67 संशयित रुग्ण कस्तुरबामध्ये भरती आहेत. आजच्या दिवसभरात एका रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर 76 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कस्तुरबा रुग्णालयात सध्या 74 रुग्ण भरती आहेत. सेव्हन हिल रुग्णालयात 10 तर मिराज हॉटेलमध्ये 10 असे एकूण 20 आंतरराष्ट्रीय प्रवाशांना होम क्वारेंटाईन करून ठेवण्यात आले आहे, असे शाह यांनी सांगितले.

23 जानेवारीपासून आतापर्यंत कस्तुरबा रुग्णालयात 2 हजार 758 बाह्य रुग्णांची तपासणी करण्यात आली. 644 संशयित रुग्ण भरती झाले होते. 562 रुग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. मुंबईतील आतापर्यंत 8 तर मुंबईबाहेरील 8 अशा एकूण 16 रुग्ण कोरोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत एकूण 561 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

खासगी रुग्णालयात नवे 89 आयसेलेशन बेड

जसलोक रुग्णालयात 5, एच एन रिलायंस रुग्णालयात 2, माहिम येथील हिंदुजा रुग्णालयात 20, कोकिलाबेन रुग्णालयात 17, रहेजा रुग्णालयात 12, जगजीवन राम वेस्टर्न रेल्वे रुग्णलयात 10, गुरुनानक रुग्णालयात 2, सेंट एलिझाबेथ रुग्णलयात 2, बाँबे रुग्णालयात 4 तर लीलावती रुग्णलयात 15, असे एकूण 89 आयसोलेशन बेडची सुविधा येत्या एक ते दोन दिवसात उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हेही वाचा - गर्दी टाळा.. अतिमहत्वाचे काम असेल तरच घरातून बाहेर पडा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

Last Updated : Mar 18, 2020, 9:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.