ETV Bharat / state

कस्तुरबातील 'देवदूत' आता चेंबूरकरांच्या मदतीला, कोरोनाला हरवण्याचं स्वीकारलं आव्हान

सर्वत्र हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाशी दोन हात करण्याकरता जगभरातील कोरोना योद्धे हे आपला जीव धोक्यात घालून काम करताहेत. यातच रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या एका तरुण डॉक्टरने कोरोनाग्रस्तांच्या सेवेत स्वत:ला झोकून दिले आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण हाताळण्यापासून ते आजपर्यंत आयसीयूमधील गंभीर रुग्णांची तो रुग्णसेवा करत आहे. कोरोनाला न घाबरता, सुरुवातीला 90 दिवस एकही सुट्टी न घेता तो काम करत राहिला आणि आजही करत आहे.

कस्तुरबातील 'देवदूत' आता चेंबूरकरांच्या मदतीला

author img

By

Published : Jul 7, 2020, 7:24 PM IST

मुंबई : यावर्षी फेब्रुवारीमध्ये कोरोनाने चीनमध्ये हाहाकार माजवला. कोरोना नावाची दहशतच मग हळूहळू जगभर पसरू लागली. मग बघता बघता भारतातही कोरोनाचा शिरकाव झाल. हा कोरोना दहशत माजवणार याचा अंदाज घेत मागील दोन वर्षे गिर्यारोहणामध्ये रमणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणामधील डॉक्टर जागा झाला. त्याने कोरोनासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. तो मुंबईतील पहिल्या कोव्हिड रुग्णालयात अर्थात कस्तुरबा रुग्णालयात रुजू झाला. अगदी कोरोनाच्या कामाला सुरुवात झाल्यापासून, पहिल्या दिवसापासून डॉक्टरांच्या टीममध्ये काम करणारा हा डॉक्टर कस्तुरबामधील रुग्णांसाठी 'परमेश्वर', ‘देवदूत’ ठरला आहेच. पण आता हाच देवदूत चेंबूरमधील झोपडपट्टीवासीयांसाठी धावून आला आहे.

या देवदूताचे नाव आहे, डॉ. परमेश्वर उर्फ देवा मुंढे. मूळचा बीडचा पण चेंबूर येथील इंदिरा नगर, चेंबूर कॅम्प झोपडपट्टीत राहणारा परमेश्वर मोठ्या कष्टाने डॉक्टर (एमबीबीएस) झाला. केईएममधून डॉक्टरकी पूर्ण केल्यानंतर तो अचानक गिर्यारोहणाकडे वळला आणि त्यातच रमला. पण, कोरोनाने मात्र त्याला पुन्हा डॉक्टरकीकडे वळवले. कोरोनाचा पहिला रुग्ण हाताळण्यापासून ते आजपर्यंत आयसीयूमधील गंभीर रुग्णांची तो रुग्णसेवा करत आहे. कोरोनाला न घाबरता, सुरुवातीला 90 दिवस एकही सुट्टी न घेता तो काम करत राहिला आणि आजही करत आहे.

आता त्याच्या कामाच्या वेळा बदलल्या असून त्याला तीन-चार दिवस रिकामे मिळत आहेत. दरम्यान कस्तुरबामध्ये काम करताना त्याला जाणवले की गरीब-झोपडपट्टीतील लोकांना वेळेत उपचार मिळत नाहीत. शेवटच्या स्टेजला अनेक रुग्ण येत असून ते दगावत आहेत. हे त्याला कुठे तरी अस्वस्थ करत होते. आपण जिथे लहानाचे मोठे झालो तिथल्या लोकांसाठी काय करू शकतो, या विचारातुन त्याने अखेर चेंबूर कॅम्प, लाल मिट्टी गार्डनच्या बाजूला नुकतेच एक क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकद्वारे आता तो संभाव्य रुग्णांना सेवा देत आहे.

कोरोनाचा शिरकाव होऊन तीन महिने उलटले तरी भीतीपोटी आजही अनेक खासगी डॉक्टर आपले क्लिनिक-रुग्णालय बंद करून बसले आहेत. अशावेळी कस्तुरबामध्ये कोरोना योध्दा म्हणून काम करणाऱ्या परमेश्वरने झोपडपट्ट्यातील गरीब रुग्णांचे वेळेत निदान व्हावे, वेळेत उपाचर मिळावेत म्हणून हे क्लिनिक सुरू केले. त्यांच्या या कामाचे चेंबूरमध्ये कौतुक होत असून त्याच्या या कामामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. क्लिनिक सुरू झाल्यापासून दोन दिवसात त्याने दोन संशयितांना पुढील उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवले आहे.

कोरोना कहर अजून संपलेला नाही. झोपडपट्टीत फिजिकल डिस्टन्सिंग पाळता येत नाही वा सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतो. त्यामुळे इथे संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे झोपडपट्टीत रुग्ण अधिक आढळत आहेत. त्यामुळे अशा परिसरात आपण क्लिनिक सुरू केल्याचे परमेश्वर सांगतो. तर, आता शक्य तितके चांगले उपचार गरीब रुग्णांना देण्याचा प्रयत्नही असणार असल्याचे तो म्हणतो. कोरोनाच्या या संकटात, खासगी रुग्णालये बंद असताना आता हे क्लिनिक सुरू झाल्याने येथील झोपडपट्टीवासींयाना नक्कीच 'परमेश्वर'च धावून आल्याची भावना सर्वप्रथम मानत येत असेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.