मुंबई - 'मी टू' अभियानांतर्गत चर्चेत आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता यांचे वकील अॅड. नितीन सातपुते यांच्या विरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर खेरवाडी पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, अॅड. नितीन सातपुते आणि तक्रारदार महिला शिवाजी पार्क येथील एकाच इमारतीमध्ये राहतात. अॅड. सातपुते यांनी घराजवळ गार्डन बनवले आहे. त्याला तक्रारदार महिलेने आक्षेप घेतला आणि त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. याबाबत आपल्याला अॅड. सातपुते यांनी धमकावले असल्याची तक्रार या महिलेने माहीम पोलीस ठाणे आणि राज्य महिला आयोगाकडे केली होती. त्यावर ३० डिसेंबर २०१९ रोजी सुनावणी होती. त्यावेळी महिला आयोगाच्या कार्यालयात आपल्याशी बोलताना अश्लील शब्द वापरल्याचे अॅड. सातपुते यांनी बोलल्याचे तक्रारदार महिलेचे म्हणणे होते. तिने केलेल्या तक्रारीवरून २ जानेवारी २०२० रोजी खेरवाडी पोलीस ठाण्यात अॅड. सातपुते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - सावित्रीबाईंना शेण, दगड मारले होते; पण १८४८ साली त्यांच्या पहिल्याच शाळेत होत्या ४५ मुली
हेही वाचा - ''अभ्यासपूर्ण पद्धतीने नाटकाकडे पाहण्याचा प्रयत्न 100 व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने व्हावा ही इच्छा''