ETV Bharat / state

'त्या' बेवारस मृतदेहाची ओळख पटली, भावानेच बहिणीच्या नवऱ्याचा खून केल्याचे उघड

author img

By

Published : Feb 29, 2020, 5:34 PM IST

Updated : Feb 29, 2020, 5:57 PM IST

दारू पाजून गांधीनगर जंक्शन जवळील नेव्ही कॉलनीच्या पाठीमागील निर्जन ठिकाणी नेऊन एकाचा खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चार आरपींना पोलिसांनी अटक केली आहे.

mumbai crime
'त्या' बेवारस तरुणाची ओळख पटली, भावानेच बहिणीच्या नवऱ्याचा खून केल्याचे उघड

मुंबई - गांधीनगर जंक्शन जवळील नेव्ही कॉलनीच्या झाडीत 20 फेब्रुवारीला एका 25 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. कौटुंबिक वादातून पत्नीच्या भावानेच मित्राच्या मदतीने खून केल्याचे आता उघड झाले आहे. या प्रकरणी निखिल टाक व रवी टाक यांना विक्रोळी पार्क साईट पोलिसांनी अटक केली आहे.

सिद्धार्थ सातपुते असे हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींनी सिद्धार्थला दारू पाजून गांधीनगर जंक्शन जवळील नेव्ही कॉलनीच्या पाठीमागील निर्जन ठिकाणी नेऊन त्याचा दगडाने ठेचून खून केला व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. स्थानिकांनी झाडीमध्ये एका तरुणाचा मृतदेह पडल्याचे पार्कसाईट पोलिसांना कळवले. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळावर जावून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर मात्र मृतदेहाची ओळख पटत नव्हती. ओळख पटवण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. मृताच्या अंगावर काही गोंदवलेली नक्षी व हातामधील कडे तसेच गळ्यावर ओम चिन्हे असल्याने पोलिसांनी ही माहिती मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात दिली.

मुंबईतील आरपीएफ पोलीस ठाण्यात समजल्यानंतर हा आर. सी. एफ. पोलीस ठाण्यात सिद्धार्थ सातपुते याचाच हा मतदेह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तपास करीत मृताच्या कुटुंबाची ओळख पटवली. मृत व त्याच्या पत्नीचे वाद काही दिवस झाले सुरू होते. यातच सिद्धार्थने त्याचा मेहुणा रवी टाक याच्या कानावर कोयत्याने वार केल्याचे पोलीस तपासत समजले. याच्या आधारे पोलिसांनी रवी टाक व निखिल टाक यांना ताब्यात घेत चौकशी केली असता या दोघांनी त्याचे मित्र आयन व साईनाथ याच्या मदतीने खून केल्याचे कबूल केले.

घटनेप्रकरणी पोलिसांनी रवी टाक व निखिल टाक या दोन भावांना अटक केले आहे. उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त अखिलेशकुमार सिंह यांनी यावेळी सांगितले

हेही वाचा - धक्कादायक! प्रेम प्रकरणातून मुलीच्या आईला घातल्या गोळ्या; आरोपी फरार

Last Updated : Feb 29, 2020, 5:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.