ETV Bharat / state

अर्णब गोस्वामी हक्कभंग प्रकरण; 'हा' व्हिडिओ दाखवत भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला - भाजप नेते अतुल भातखळकर

टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेनेने हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभेत आणला होता. यावर आज अधिकारी व शिवसेना नेत्यांची विधानभवनात बैठक बोलावण्यात आली आहे. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर बाळासाहेबांचा एक व्हिडिओ टाकत शिवसेनेला टोला लगावला आहे.

BJP leader Atul Bhatkhalkar
भाजप नेते अतुल भातखलकर
author img

By

Published : Nov 5, 2020, 7:33 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेनेने हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभेत आणला होता. यावर आज अधिकारी व शिवसेना नेत्यांची विधानभवनात बैठक बोलावण्यात आली आहे. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर बाळासाहेबांचा एक व्हिडिओ टाकत शिवसेनेला टोला लगावला आहे.

  • आज विधिमंडळाच्या हक्क भंग समितीची पहिली बैठक होणार असून यात वरिष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांचा मुद्दा चर्चेस येणार आहे. कोणत्याही निर्णयापर्यंत पोहचण्यापूर्वी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार, मा.शिवसेनाप्रमुखांचा हा व्हिडिओ नक्की पाहतील आणि निर्णय करतील अशी मी अशा बाळगतो. @OfficeofUT pic.twitter.com/mjhzbIOsmI

    — Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीविरुद्ध ७ सप्टेंबर, २०२० रोजी हक्कभंग प्रस्ताव उपस्थित करण्यात आला होता. याप्रकरणी विधानसभा विशेषाधिकार समितीसमवेत प्राथमिक विचारविनिमय करण्याबाबत आज विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे आमदार, नेते उपस्थित राहणार आहेत. बैठकीत अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री व आदी नेत्यांवर केलेल्या हक्कभंग वक्तव्यावर काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा होणार आहे. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर टाकला आहे. तसेच, कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार शिवसेनाप्रमुखांचा हा व्हिडिओ नक्की पाहतील आणि निर्णय करतील, अशी मी अशा बाळगतो, असे म्हटले आहे.

काय आहे ट्विट केलेल्या व्हिडिओत?

व्हिडिओत बाळासाहेब ठाकरे हे भाषण करत आहेत. त्यात तत्कालीन सरकारविरोधात लिहिलेल्या अग्रलेखावरून, काय नोटिसा, खटले आणि शिक्षा करायची असेल ते करा. त्यांनी काही आम्ही थांबणार नाही. कोणाचे हक्कभंग म्हणून शिक्षा करणार. सामान्य माणसांच्या हक्कासाठी आम्ही असेच लिहीत राहणार, असे बाळासाहेबांनी म्हटले होते.

हेही वाचा- बेस्टच्या मदतीला एसटी धावली, पालिकेने एसटीला दिले ३० कोटी भाडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.