ETV Bharat / state

लोअर परळ येथे अंगावर झाड कोसळून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू

author img

By

Published : Sep 5, 2020, 1:21 AM IST

लोअर परळच्या पांडुरंग बुंडकर मार्ग मारवाडी चाळ, एन.एम. जोशी मार्ग येथे आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एक झाड कोसळले. यावेळी रस्त्यावरुन समर दिनेश बोस्क (९) हा मुलगा जात होता. त्याच्या अंगावर झाड कोसळले. त्याला उपचारासाठी तातडीने परळ येथील लहान मुलांच्या वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. या मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

A 9-year-old boy died after a tree fell on him in lower parel
लोअर परळ येथे अंगावर झाड कोसळून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू

मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात झाडे पडण्याच्या घटना घडतात. अशा दुर्घटनेत नागरिक जखमी होण्याच्या तसेच मृत्यू होण्याच्या घटना घडतात. अशीच एक घटना लोअर परळ येथे घडली आहे. अंगावर झाड पडून एका ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

लोअर परळच्या पांडुरंग बुंडकर मार्ग मारवाडी चाळ, एन.एम. जोशी मार्ग येथे आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एक झाड कोसळले. यावेळी रस्त्यावरुन समर दिनेश बोस्क (९) हा मुलगा जात होता. त्याच्या अंगावर झाड कोसळले. त्याला उपचारासाठी तातडीने परळ येथील लहान मुलांच्या वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. या मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पालिकेच्या नियमाप्रमाणे पालिकेच्या हद्दीतील झाड पडून एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला एक लाख रुपयांची मदत दिली जाते. मात्र आज एका खासगी कंपाऊंडमधील झाड पडून दुर्घटना घडली आहे. यामुळे खासगी जागेतील झाड पडून एखाद्याचा मृत्यू झाला असला, तरी पालिकेने नुकसान भरपाई द्यायला हवी अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.