मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी रुग्ण संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. आज दिवसभरात 684 नवे रुग्ण ( Corona Positive Patients ) आढळून आले. पैकी 24 रुग्णांचा मृत्यू झाला. तर ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येत आठने वाढ झाल्याने ही संख्या 28 वर ( Omicron Patients In Maharashtra ) गेल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
6 हजार 481 सक्रिय रुग्ण
राज्यात सोमवारी (दि. 13 डिसेंबर) 569 नवीन कोरोना बाधित आढळून आले होते. रुग्ण संख्या कमी झाल्याने एक दिलासा मिळाला होता. मात्र, रुग्ण संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. आज (दि. 14 डिसेंबर) दिवसभरात 684 नवीन रुग्ण सापडले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 45 हजार 136 पर्यंत पोहोचला आहे. तर 24 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आज 686 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 93 हजार 688 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 टक्के आहे. तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 70 लाख 63 हजार 688 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 09.91 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 75 हजार 492 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहे. 6 हजार 481 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
- या विभागात सर्वाधिक रुग्ण -
- मुंबई महापालिका - 217
- ठाणे पालिका - 7
- ठाणे - 20
- नवी मुंबई पालिका - 19
- कल्याण डोंबिवली पालिका - 11
- वसई विरार पालिका - 11
- नाशिक - 22
- नाशिक पालिका - 28
- अहमदनगर - 40
- अहमदनगर पालिका - 3
- पुणे - 61
- पुणे पालिका - 75
- पिंपरी चिंचवड पालिका - 42
ओमायक्रॉनचे आठ नवे रुग्ण
राज्यात ओमायक्रॉनचा संसर्ग फैलावत आहे. आज (दि. 14 डिसेंबर) दिवसभरात ओमायक्रॉनचे ( Omicron Variant ) 8 रुग्ण आढळून आले. मुंबईतील 7 तर वसईतील 1 रुग्णाचा यात समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेश वगळता राज्यात अन्य कोठेही रुग्ण आढळून आलेला नाही. आठपैकी 6 जणांना घरी तर दोघांचे रुग्णालयात विलगिकरण केले आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील चाचण्या असून कोणाचाही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. आठ रुग्णांपैकी 3 महिला तर 5 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. या सर्वांच्या निकटवर्तीयांचा आरोग्य विभागामार्फत शोध सुरू आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
- राज्यात या भागात आढळले ओमायक्रॉन रुग्ण -
- मुंबई - 12
- पिंपरी चिंचवड - 10
- पुणे मनपा क्षेत्र - 3
- कल्याण डोंबिवली - 1
- नागपूर - 1
- लातूर - 1
आजपर्यंत 430 प्रवाशांची जनुकीय चाचणीसाठी नमुने
1 डिसेंबरपासून आजपर्यंत 91 हजार 320 प्रवासी मुंबईत उतरले. एकूण 15 हजार 621 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 30 आणि इतर देशातील 8 अशा एकूण 38 तर आजपर्यंतच्या 430 प्रवाशांची जनुकीय चाचणी ( Genome Sequencing ) करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. पैकी 21 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
जगात ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगात ( First Omicron Death ) पहिला बळी गेला आहे. हा मृत्यू झाल्याची माहिती इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ( British Prime Minister on Omicron Death In UK ) दिली आहे.
हे ही वाचा - ST Worker Strike : शिवसेनेला अडचणीत आण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत कर्मचारी संघटनेचा छुपा पाठींबा?