ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 635 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांचा आकडा 9 हजार 758 वर - धारावी कोरोना अपडेट

मंगळवारी मुंबईत कोरोनाचे नवे 635 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 515 रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले आहेत. तर 120 रुग्ण 1 ते 3 मे दरम्यान खासगी लॅबमध्ये करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. झालेल्या 26 मृत्यूंपैकी 20 मृत्यू गेल्या 24 तासात झाले आहेत तर 6 मृत्यू 1 ते 2 मे दरम्यान झाले आहेत.

Corona positive
कोरोना पॉझिटिव्ह
author img

By

Published : May 6, 2020, 7:47 AM IST

मुंबई - कोरोनाचे मुंबईत 635 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 9 हजार 758 वर पोहचला आहे. मागील चोवीस तासांत मुंबईत 26 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 387 वर पोहचला आहे. 220 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत 2 हजार 128 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मंगळवारी मुंबईत कोरोनाचे नवे 635 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 515 रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले आहेत. तर 120 रुग्ण 1 ते 3 मे दरम्यान खासगी लॅबमध्ये करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. झालेल्या 26 मृत्यूंपैकी 20 मृत्यू गेल्या 24 तासात झाले आहेत तर 6 मृत्यू 1 ते 2 मे दरम्यान झाले आहेत. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्याचा समावेश आजच्या आकडेवारीत करण्यात आला. 26 पैकी 16 पुरुष तर 10 महिला रुग्ण होत्या, तर २२ जणांना दीर्घकालीन आजार होते.

धारावीत 665 रुग्ण, 20 मृत्यू -

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत गेल्या 24 तासात 33 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात 18 महिला तर 15 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. धारावीतील एकूण रुग्णांची संख्या 665 वर पोहचली असून आत्तापर्यंत 196 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 20 जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीतील 83 हजार 500 लोकांचे स्क्रिनिंग करण्यात आले असून 2 हजार 380 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.