ETV Bharat / state

Mumbai Crime News: फसवणुकीच्या गुन्ह्यांतून बाहेर काढण्याचे आश्‍वासन; नऊ लाखांची लाच घेताना ६२ वर्षांच्या वयोवृद्धाला अटक - लाच घेताना अटक

लाच घेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत नऊ लाखांची लाच घेताना ६२ वर्षांच्या वयोवृद्धाला अटक करण्यात आली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांत मदतीचे आश्‍वासन देऊन लाचेची मागणी करण्यात आली होती.

Mumbai Crime News
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
author img

By

Published : Apr 2, 2023, 11:42 AM IST

मुंबई : नऊ लाख रुपयांची लाच घेताना जयविलास जयसिंग दळवी नावाच्या एका ६२ वर्षांच्या वयोवृद्धाला शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. ही लाच पोलिसांच्या वतीने स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली आहे. यातील तक्रारदारासह त्यांच्या कुटुंबातील चौघांविरुद्ध सप्टेंबर २०२२ रोजी दहिसर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. बार भाड्याने दिलेल्या व्यवहारात त्यांनी सुमारे दीड कोटी रुपयांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप होता.

मदत करण्याचे आश्‍वासन : याच गुन्ह्यांत संबंधित चारही आरोपींविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. याच दरम्यान जयविलास यांनी तक्रारदारांना भेटून त्यांची दहिसर पोलीस ठाण्यातील तपास अधिकार्‍यांशी चांगली ओळख आहे. त्यांना गुन्ह्यांतून बाहेर काढण्यासाठी मदत करतो, असे सांगून त्यांच्याकडून नऊ लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. इतकेच नाही, तर त्यांच्यासह त्यांच्या आईला अटकपूर्व जामिनासाठी मदत करण्याचे आश्‍वासन दिले होते. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जयविलासविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ अटक : या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या अधिकार्‍यांनी दहिसर येथील न्यू लिंक रोड, संभाजीनगर, इन्फिनिटी सेल्थ परिसरात सापळा लावला. जयविलासला तक्रारदाराकडून नऊ लाखांची लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ अटक केली. याच गुन्ह्यात त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यांनी कुठल्या पोलीस अधिकार्‍यांसाठी ही लाचेची मागणी केली होती, याचा तपास सुरु आहे. या प्रकरणात फिर्यादी यांच्याविरुध्द दहिसर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ४२० व इतर प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

नऊ लाखाची मागणी : 31 मार्चला पडताळणीदरम्यान फिर्यादी हे आरोपी दळवी यांना इनफिनिटी सेल्य, संभाजी नगर, न्यू लिंक रोड, दहिसर (पूर्व) मुंबई या ठिकाणी भेटले. त्यावेळेस आरोपीने तक्रारदाराला सांगितले की, या गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांची आई यांना अटकपूर्व जामिन मिळवून देण्यासाठी मी तपास अधिकारी यांच्याकडे ओळखीमुळे मदत करेन. मदत करण्याकरीता आरोपी खाजगी इसम दळवी याने फिर्यादी यांच्याकडे नऊ लाखाची मागणी केली. या लाचेची रक्कम खाजगी इसम दळवीने स्विकारल्याने त्यांना एसीबीकडून रंगेहाथ पकडण्यात आले.

हेही वाचा : Nagpur ACB Action: विधिमंडळात प्रश्न उपस्थित होऊ न देण्याकरिता कोटीच्या लाचेची मागणी, जाणून घ्या नेमके प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.