ETV Bharat / state

मुंबई कोरोनाचे 607 नवे रुग्ण तर, 9 जणांचा मृत्यू

मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 607 नवे रुग्ण आढळून आले असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन लाखांच्यावर गेला आहे. १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू होत आहे.

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Jan 15, 2021, 8:58 AM IST

मुंबई - राजधानी मुंबईमध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. त्यानंतर 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409 पर्यंत खाली आली. काल (गुरूवारी) मुंबईत कोरोनाचे 607 नवे रुग्ण आढळून आले असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन लाखांच्यावर गेला आहे.

7 हजार 332 सक्रिय रुग्ण -

मुंबईत गरुवारी कोरोनाचे 607 नवे रुग्ण आढळून आले असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईमधील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 1 हजार 78 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 11 हजार 219 वर पोहचला आहे. मुंबईमधून गुरुवारी 789 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 81 हजार 642 झाली आहे. सध्या मुंबईत 7 हजार 332 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 375 दिवसांवर -

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 375 दिवस तर, सरासरी 0.21 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 137 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 2 हजार 312 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 25 लाख 49 हजार 307 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

या दिवशी झाली आहे कमी रुग्णसंख्येची नोंद -

  • 7 नोव्हेंबर - 576 रुग्ण
  • 2 नोव्हेंबर - 706 रुग्ण
  • 3 नोव्हेंबर - 746 रुग्ण
  • 6 नोव्हेंबर - 792 रुग्ण
  • 9 नोव्हेंबर - 599 रुग्ण
  • 10 नोव्हेंबर - 535 रुग्ण
  • 14 नोव्हेंबर - 574 रुग्ण
  • 16 नोव्हेंबर - 409 रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.