हैदराबाद- देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. काल (8 ऑगस्ट) भारतात 60 हजार कोरोना रुग्ण सापडल्याने कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 21 लाख 14 हजार 140 झाला आहे. तर, एकूण 42 हजार 518 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र- राज्यात काल (8 ऑगस्ट) सर्वोच्च १२ हजार ८२२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून २७५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात कोरोनाच्या सुमारे ७७ हजार ३७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर, ११ हजार ८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६७.२६ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण बरे झाले असून सध्या १ लाख ४७ हजार ४८ रुग्णांवर (अॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दिल्ली- ऑगस्ट महिन्यातील सेरोलॉजिकल सर्व्हे संपुष्टात आला आहे. अहवालानुसार दिल्लीतील 11 जिल्ह्यांमधून 15 हजार नमुने जमा करण्यात आले आहेत. आजपासून येत्या 10 दिवसात या अहवालांमधील निष्कर्षाबाबत माहिती देण्यात येईल, त्यानंतरच राज्यातील 18 सरकार मान्य प्रयोगशाळेत या नमुन्यांवर प्रक्रिया केली जाणार आहे.
झारखंड- धनबाद येथील एका रुग्णालयातील वरांड्यात उघड्यावर एका महिलेला तिच्या दोन मुलांसह रात्र काढावी लागली होती. त्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरोन यांनी या प्रकरणी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने महिलेसह तिच्या दोन्ही मुलांना रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये दाखल केले आहे.
दरम्यान, काल राज्यात गेल्या 24 तासात 678 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 16 हजार 542 झाली आहे. त्यापैकी 154 रुग्णांचा मृत्यू झाला असून 7 हजार 503 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
ओडिशा- बारगर येथील भाजपचे खासदार सुरेश पुजारी यांना कोरोना झालेला आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 30 हजारच्या पार गेली आहे. तर काल 1 हजार 544 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.
मध्य प्रदेश- राज्याला आत्मनिर्भर करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.
दरम्यान, ग्वालियरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात 'किल कोरोना स्क्वाड' या पथकाला तैनात करण्यात आले आहे. गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी या पथकाची निर्मिती केली आहे. तसेच, जिल्ह्यातील नागरिकांनी सामाजिक अंतर पाळणे व मास्क न घातल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
बिहार- राज्यात कोरोनाने कहर केला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 75 हजाराच्या पार गेली आहे. मागील 3 दिवसात राज्यात 10 हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणाजे, यापूर्वी 10 हजाराचा आकडा गाठण्यासाठी राज्याला 102 दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र, सध्या आलेल्या आकड्यांमधून संसर्गाचा वेग वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, राज्यातील 46 हजार 265 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
उत्तर प्रदेश- काल राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोएडा येथील सेक्टर 39 येथे एका 400 खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन केले. यावेळी नोएडाचे जिल्हा दंडाधिकारी सुहास एल.वाय देखील उपस्थित होते.
हेही वाचा- केरळ विमान अपघात: 'धावपट्टी 10 च्या धोक्याची DGCA ला पूर्वकल्पना, मात्र, उपाययोजना केल्या नाहीत'