ETV Bharat / state

वर्षभरात कलम 188अंतर्गत मुंबईत तब्बल 60 हजार गुन्हे दाखल; सर्वाधिक गुन्हे उत्तर मुंबईत - मुंबई कलम १८८ उल्लंघन गुन्हे

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांवरील ताण पुन्हा वाढला आहे. राज्यात मिनी लॉकडाऊन सुरू आहे, नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई आहे. तरी देखील अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत.

Mumbai section 188 violation cases
मुंबई कलम १८८ उल्लंघन गुन्हे
author img

By

Published : Apr 12, 2021, 1:07 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोनाची रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी मुंबईत 9 हजार 958 नविन कोरोनाबाधित आढळले तर, 51 कोरोना रूग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई शहरात कलम 188 नुसार धडक कारवाई केली जात आहे. मुंबई पोलिसांनी 20 मार्च 2020 ते 11 एप्रिल 2021 या काळात तब्बल 60 हजार 66 जणांवर कलम 188चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

वर्षभरात कलम 188अंतर्गत मुंबईत तब्बल 60 हजार गुन्हे दाखल झाले आहेत

60 हजार 66पैकी 9 हजार 201व्यक्ती फरार असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत. आतापर्यंत 23 हजार 352 आरोपींना मुंबई पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. 27 हजार 513 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केलेली आहे.

उत्तर मुंबई नियम मोडण्यात आघाडीवर -

कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये मुंबईत हॉटेल व इतर आस्थापने विहित वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू ठेवणे, पान टपरी व इतर दुकाने सुरू ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, अवैध वाहतूक, मास्क न लावणे याबाबत विविध ठिकाणी कारवाया करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांकडून मुंबईतील दक्षिण, मध्य, पूर्व, पश्चिम, उत्तर अशा सर्व विभागांमध्ये कारवाया झाल्या आहेत. दक्षिण मुंबईत 6 हजार 582 गुन्हे दाखल करण्यात आले असून मध्य मुंबईत 2 हजार 964, पूर्व मुंबईत 4 हजार 841, पश्चिम मुंबईत 3 हजार 994 तर उत्तर मुंबईत सर्वाधिक 10 हजार 900 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मास्क न वापरणाऱ्यांची संख्या जास्त -

गेल्या 24 तासात मुंबईत कलम 188 अंतर्गत एकूण 73 गुन्हे दाखल करण्यात आले असून दक्षिण मुंबईत 9, मध्य मुंबई 10, पूर्व मुंबई 15, पश्चिम मुंबईत 8 तर उत्तर मुंबई 31 गुन्हे दाखल करण्यात झाले आहेत. 18 एप्रिल 2020पासून ते 11 एप्रिल 2021 या काळामध्ये तब्बल 12 हजार 804 मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.

काय आहे कलम १८८ -

१८९७ साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार साथीच्या काळात आपोआप काही नियम लागू होतात. सरकारी अधिकारी याचा आधार घेऊन आवश्यक ते आदेश देऊ शकतात किंवा दिलेले आदेश रद्द करू शकतात. या सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तींवर कलम १८८ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल होतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.