ETV Bharat / state

अंधश्रद्धेपोटी निष्पाप वृद्धाचा खून; 6 जणांना अटक

अंधश्रध्देतून एका 70 वर्षीय वृद्धाचा खून झाल्याची घटना घडलेली होती. पोलिसांना या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे.

arrested accused
अटक करण्यात आलेले आरोपी
author img

By

Published : Oct 14, 2020, 2:22 PM IST

मुंबई- आपल्या बापावर करणी केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे आपल्या बापाच्या आत्म्याला शांती मिळत नसल्याने आपल्या समाजातील किंवा परिसरातील 3 जणांचा खुन केला, तर मेलेल्या बापाच्या आत्म्याला शांती मिळेल या अंधश्रद्धेपोटी मुंबईतील मुलुंड परिसरामध्ये एका निष्पाप वयोवृद्ध वृद्धाचा खून करणाऱ्या तब्बल 6 जणांना अटक केली आहे.

मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 ऑक्टोबर रोजी एका 70 वर्षीय वृद्धाचा खून झाल्याची घटना घडलेली होती. या कामी मुंबई पोलिसांची 5 पथकही तयार करण्यात आली होती. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींच्या शोधासाठी पाठवण्यात आले होते. ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या परिसरात राहणाऱ्या लोकांकडे पोलिसांनी चौकशी केली असता या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या मृत्यू झाला होता. मात्र, त्या मयत व्यक्तीच्या समाजातील लोकांनी दुखवटा व्यक्त केला नव्हता व अंत्यविधीत सहभागी झाले नव्हते म्हणून या मयत व्यक्तीच्या 2 मुलांच्या मनात राग होता, अशी माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी दीपक मोरे (38) व विनोद मोरे (30) या दोन व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत या दोन व्यक्तींनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली देत म्हटले, की आपल्या वडिलांवर समाजातील व परिसरातील लोकांनी करनी केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा समज या दोघांचा झालेला होता. वडिलांच्या आत्म्यास शांती मिळायची असेल, तर त्यासाठी समाजातील व परिसरातील तीन लोकांची हत्या करावी लागेल, असा समज या दोन्ही आरोपींनी केल्यानंतर तसा कट या दोघांनी रचलेला होता. एक वृद्ध व्यक्ती या 2 आरोपींच्या घरापासून काही अंतरावर निर्जन स्थळी रोज रात्री झोपायला जातो. हे लक्षात आल्यानंतर या दोन आरोपींनी देवनार व घाटकोपर परिसरात राहणाऱ्या चार जणांना खुणासाठी 70 हजार रुपयांची सुपारी दिली होती.

मयत वृद्ध व्यक्तीचा खून केल्यानंतर 4 आरोपी अजमेर , राजस्थान या ठिकाणी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांची पथके या ठिकाणी पोहचली होती. मात्र हे सर्व आरोपी मुंबईत पुन्हा आले असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी मुंबईतील रमाबाई नगर, घाटकोपर या ठिकाणी सापळा रचून आसिफ नासिर शेख (28), मोहिद्दिन अल्लाउद्दीन अन्सारी (27), आरिफ अब्दुल सत्तार खान ( 30), शहनवाज शेख (30) या आरोपींना अटक केलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.