ETV Bharat / state

आज...आत्ता...संध्याकाळी 7 पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर... - bulletin

गृहनिर्माण मंत्री मेहतांवर लोकायुक्तांचे ताशेरे, अधिवेशनाच्या तोंडावर भाजपच्या अडचणी वाढल्या. भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करणारे मुख्यमंत्री आता प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का ? जयंत पाटील. तेलंगणात काँग्रेसला मोठा दणका; १२ आमदार फुटले. नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यात कोणत्याही बैठकीचे नियोजन नाही - परराष्ट्र मंत्रालय. दहावीच्या निकालासंबंधी अफवांचा पाऊस : मंडळाच्या घोषणेपूर्वी विश्वास ठेवू नये, शिक्षण मंडळाचे आवाहन.

आज...आत्ता...संध्याकाळी 7 पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...
author img

By

Published : Jun 6, 2019, 7:29 PM IST

गृहनिर्माण मंत्री मेहतांवर लोकायुक्तांचे ताशेरे, अधिवेशनाच्या तोंडावर भाजपच्या अडचणी वाढल्या

मुंबई - ताडदेव मिल कंपाऊंड प्रकरणी लोकायुक्तांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. एसआरए प्रकरणात मेहता यांनी संबंधितांना मदत केल्याचे निरीक्षण लोकायुक्तांनी नोंदवले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य सरकारच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर

भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करणारे मुख्यमंत्री आता प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का ? जयंत पाटील

मुंबई - फडणवीस मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांची मेहतांच्या चौकशीसारखी निःपक्षपाती चौकशी होणार का? आणि दोषी आढळल्यानंतर आता तरी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. एसआरए घोटाळ्यात प्रकाश मेहता दोषी असल्याचा अहवाल लोकयुक्तांनी दिला आहे. त्यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी हा सवाल केले आहे. वाचा सविस्तर

तेलंगणात काँग्रेसला मोठा दणका; १२ आमदार फुटले

हैदराबाद - तेलंगणा येथील काँग्रेस पक्षातील १२ आमदारांनी आज विधानसभा सभापती पोचाराम श्रीनिवास रेड्डी यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये आमदारांनी काँग्रेस पक्ष विद्यमान सत्ताधारी पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये विलीन करण्याचे पत्र सभापतींना दिले आहे. त्यामुळे तेलंगणा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वाचा सविस्तर

नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यात कोणत्याही बैठकीचे नियोजन नाही - परराष्ट्र मंत्रालय

नवी दिल्ली - पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव तथा माजी उपायुक्त सोहेल मेहमूद काल ईद निमित्त भारतात हजर होते. यावेळी त्यांनी भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकऱ्यांसोबत चर्चा केली. यानंतर पुढील आठवड्यात किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची बैठक होईल, असे सांगण्यात येत होते. परंतु, परराष्ट्र मंत्रालायाचे अधिकृत प्रवक्ते रवीश कुमार यांनी या बैठकीची शक्यता फेटाळताना नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यात अशा कोणत्याही बैठकीचे आयोजन करण्यात आले नाही, असे स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर

दहावीच्या निकालासंबंधी अफवांचा पाऊस : मंडळाच्या घोषणेपूर्वी विश्वास ठेवू नये, शिक्षण मंडळाचे आवाहन

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी वेगळ्या प्रकारची कार्यवाही सुरू आहे. त्यासंदर्भात मंडळाकडून निकाल केव्हा जाहीर केला जाईल याचे एकत्रित प्रकटन जाहीर केले जाते. मात्र, त्यापूर्वीच काही समाजमाध्यम आणि इतर माध्यमांमध्ये निकाल जाहीर होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात असून अशा खोट्या बातम्या आणि त्यासंदर्भातील अफवांवर विद्यार्थी-पालकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले आहे. वाचा सविस्तर

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.