ETV Bharat / state

आज...आत्ता...दुपारी 2 पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...

मनोहरलाल खट्टरांना सेल्फी खटकल्याचे पहायला मिळाले. त्यावेळी त्यांनी चक्त कार्यकर्त्याला फटकारून बाजूला ढकलले आहे. दुसरीकडे रेपो दरात पाव टक्के घट झाली. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त होणार आहे. 'भारत'नं पहिल्याच दिवशी पार केला ४० कोटींचा गल्ला. AUS vs WI: कॅरिबियन संघ आज भिडणार कांगारुंशी.

आज...आत्ता
author img

By

Published : Jun 6, 2019, 2:19 PM IST

मनोहरलाल खट्टरांना सेल्फी खटकला; कार्यकर्त्याला फटकारून ढकललं बाजूला

चंदीगड - हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी एका कार्यकर्त्याला सेल्फी घेत असताना चांगलेच फटकारले. एका कार्यक्रमात खट्टर फुले उधळत असताना हा कार्यकर्ता मोबाईल घेऊन त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा खट्टर यांनी त्यांच्या हातावर जोरदार फटका मारून त्याला दूर केले. वाचा सविस्तर -

रेपो दरात पाव टक्के घट; गृहकर्ज स्वस्त होणार

मुंबई - मौद्रीक धोरण समितीच्या ३ दिवसीय बैठकीनंतर रिझर्व बँकेचे आगामी त्रैमासीक धोरण जाहीर करण्यात आले आहे. यावेळी रेपो दरात पाव टक्के कपात केली असून रेपो दर ६ टक्क्यांवरून ५.७५ टक्के करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. वाचा सविस्तर -

भाईजानची जादू कायम, 'भारत'नं पहिल्याच दिवशी पार केला ४० कोटींचा आकडा

मुंबई - बॉलिवूड भाईजान सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेला 'भारत' चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. भाईजानच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. भारत चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ४२.३० कोटींची कमाई केली आहे. वाचा सविस्तर -

AUS vs WI: कॅरिबियन संघ आज भिडणार कांगारुंशी, गेल-वॉर्नरवर सर्वांच्या नजरा

नॉटिंगहॅम - विश्वकरंडकाच्या १० व्या सामन्यात गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघात स्टार फलंदाजांचा भरणा असल्याने या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणात अडकलेले दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनामुळे कांगारुंची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. तर पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा, नाथन लॉयन अशा स्टार गोलंदाजांचा ताफा असल्याने स्पर्धेतील सर्वात संतुलित संघ म्हणून ऑस्ट्रेलियाकडे पाहिले जात आहे. वाचा सविस्तर -

उद्धव ठाकरेंनी कुटुंबासह घेतले अंबाबाईचे दर्शन; अरविंद सावंतांसह नवनिर्विचीत खासदार उपस्थित

कोल्हापूर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबांसह अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत तसेच शिवसेनेचे विजयी खासदार उपस्थित आहेत. वाचा सविस्तर -

Intro:Body:

AKSHAY - BULLETIN 2 PM

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.