ETV Bharat / state

Scholarship Exam Result Announced: पाचवी, आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर; जाणून घ्या निकालाची टक्केवारी - स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद दरवर्षी परीक्षा घेते. यामध्ये इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी शिष्यवृत्ती ज्यांना मिळवायची आहे अशांसाठी ही परीक्षा असते. यंदा 9 लाखांपैकी 19 टक्के सर्व मिळून निकालाची टक्केवारी लागली आहे. निकाल परीक्षा परिषदेने जाहीर केला आहे. यामध्ये इयत्ता पाचवी 22 टक्के तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचा 15 टक्के इतका निकाल लागला आहे.

Scholarship Exam Result Announced
स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर
author img

By

Published : Jul 13, 2023, 9:12 PM IST

मुंबई : 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती अर्थात इयत्ता पाचवी मधल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळण्यासाठीची परीक्षा तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना देखील स्कॉलरशिप मिळवण्यासाठीची परीक्षा झाली. त्या संदर्भातील 29 एप्रिल 2023 रोजी तात्पुरता निकाल जाहीर करण्यात आला होता; परंतु 9 मे 2023 पर्यंत गुण पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले गेले होते. या सर्व अर्जांचा विचार करत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निकाल जाहीर केला.

पाचवीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 22 टक्के : आज सायंकाळी 6 वाजता जाहीर केलेल्या या निकालामध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा 22 टक्के इतका निकाल लागलेला आहे. इयत्ता पाचवी करिता एकूण 5 लाख 32 हजार 876 विद्यार्थ्यांनी नाव नोंदवले होते. प्रत्यक्षात 5 लाख 14 हजार 131 उपस्थित राहिले. परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी 1 लाख 14 हजार 710 आणि त्यामधून प्रत्यक्ष उत्तीर्ण झाले. शिष्यवृत्तीला पात्र झालेले 16,537 इतके विद्यार्थी आहेत. 22 टक्के एवढा निकाल इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा लागलेला आहे.

आठवीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 15 टक्के : इयत्ता आठवीसाठी एकूण नाव नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 67 हजार 802 होती. त्यापैकी उपस्थित राहिलेले विद्यार्थी 3 लाख 56 हजार 31 आणि त्यापैकी पात्र परीक्षेसाठी विद्यार्थी 5558 होते. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 14 हजार 714 इतकी आहे. म्हणजेच 15 टक्के इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचा हा निकाल लागलेला आहे. पाचवी आणि आठवी मिळून एकूण 9 लाख 678 विद्यार्थ्यांनी नाव नोंदवले. प्रत्यक्षात ८७ हजार १६२ विद्यार्थी उपस्थित झाले. त्यापैकी परीक्षेसाठी पात्र झालेले 1 लाख 70 हजार 268 त्यातून उत्तीर्ण झालेले आहे. एकूण राज्यभरात 3 लाख 1251 विद्यार्थी आणि या सर्वांचा मिळून निकाल 19.56 टक्के इतका लागला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचीआकडेवारी: शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ग्रामीण भागातून 340 विद्यार्थी होते. तर ग्रामीण सर्वसाधारण भागातून 631 विद्यार्थी तर शहरी भागातून सर्वसाधारण मुलांमधून 6393 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ग्रामीण आणि शहरी म्हणून सर्वसाधारण मुले-मुली मिळून 123 तर निव्वळ सर्वसाधारण मुलींमधून 15 मुली मागासवर्गीय होत्या. मुले आणि मुली मिळून नऊ विद्यार्थी मागासवर्गीय मुलींमधून सहभागी आहेत.

तालुका स्तरावरील विद्यार्थ्यांची संख्या: तालुका स्तरावरील यामध्ये 130 सर्वसाधारण मुले-मुली आहेत तर ग्रामीण भागातील अनुसूचित जातीमधून 211 तर ग्रामीण भागातील भूमीहीन शेतमजुरांचे पाल्य 216 आहेत. ग्रामीण आदिवासी भागातील 43 विद्यार्थी यामध्ये आहे. एकूण शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या पाचवीमध्ये 16 हजार 537 तर इयत्ता आठवीमध्ये 14 हजार 714 इतकी संख्या आहे. एकूण शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 31 हजार 251 इतकी आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त शैलजा दराडे यांनी ई टीव्ही सोबत संवाद साधताना दिली. या शिष्यवृत्तीसाठी मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी असे विषय दिले जातात. ज्या मधून विद्यार्थ्यांना तर्कसंगत विचार करणे याची सवय होते आणि शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये याचा उपयोग त्यांना होऊ शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.