मुंबई: मुंबईल्या ॲसिड हल्ल्याने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. गिरगाव परिसरात गीता गिरकर या महिला आपल्या दोन मुलांसोबत राहत होती. पती सोडून गेल्याने विभक्त राहणाऱ्या गीता गिरकर त्या गेल्या 25 वर्षापासून पुजारी सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होत्या. महेश पुजारी चे देखील पहिले लग्न झालेले असताना तो या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. पुजारीला देखील मुले आहेत. महिलेची मुले मोठी होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून महिलेने पुजारी सोबत राहण्यास नकार दिला होता. त्याचप्रमाणे पहिल्या पत्नीकडे जाण्यासाठी तगादा लावला होता. याचाच राग मनात ठेवून पुजारी याने 13 जानेवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास गीता गिरकर पाणी भरण्यासाठी घराच्या बाहेर आली तेव्हा संधी साधून तिच्यावर ॲसिड फेकले होते.
18 दिवसांची झुंज संपली: अतिशय धक्कादायक बाब म्हणजे महिलेचे अंग जळत असताना पुजारी मात्र तू मर तू मर असे वारंवार बोलत होता. अशी माहिती महिलेच्या जबाबदातून समोर आली आहे. सुरुवातीला महिलेवर भाटिया रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्रा नंतर भायखळा येथील मसीना रुग्णालयात त्यांना शिफ्ट करून उपचार सुरू करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी पुजारीला अटक केली आहे. गीता गिरकरी यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली. त्याचप्रमाणे डोळ्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा एक डोळा निकामी झाला होता. अखेर रविवारी रात्री त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले. महिलेची 18 दिवसांची झुंज संपली आणि तिचा मृत्यू झाला.
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते: ही घटना 14 जानेवारी रोजी घडली होती. गिरगावच्या फणसवाडी परिसरात आरोपी महेश पुजारी (62) हे या ॲसिड हल्ला झालेल्या महिलेसोबतच राहत होता. गेले काही दिवस त्यांच्यात वाद सुरु होता. या कारणावरून महिला महेशला घर सोडण्यासाठी सांगत होती. याच रागातून गेल्या दोन दिवसांपासून महेश घराबाहेर राहत होता. शुक्रवारी पहाटे ही महिला पाणी भरण्यासाठी घराबाहेर पडली असता दबा धरुन बसलेल्या महेशने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. यानंतर महिलेचा आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तिचा उपचार तिचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा: Pune Koyta Gang शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर भरदिवसा कोयत्याने हल्ला