ETV Bharat / state

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तोडण्यात येणाऱ्या 54 हजार खारफुटींच्या बदल्यात पाचपट झाडे लावणार - परिवहनमंत्री रावते - plantation

महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नवी मुंबईतील 13.36 हेक्टर जमिनीवरील 54 हजार खारफुटींच्या झाडांची तोडणी करण्यात येणार असून त्याऐवजी पाच पट झाड लावण्यात येण्याचे स्पष्टीकरण परिवहन विभागाकडून देण्यात आले आहे.

संग्रहित - बुलेट ट्रेन
author img

By

Published : Jun 26, 2019, 6:00 PM IST

Updated : Jun 26, 2019, 8:24 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नवी मुंबईतील 13.36 हेक्टर जमिनीवरील 54 हजार खारफुटींच्या झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. ही सत्यता असली तरी त्याऐवजी पाचपट झाड लावण्यात येतील, असे स्पष्टीकरण परिवहन विभागाकडून देण्यात आले आहे.

शिवसेनेच्या विधानपरिषदेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधानपरिषदेत लेखी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी लेखी उत्तर दिले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी खारफुटीच्या झाडांची मोठया प्रमाणात कत्तल करण्यात येणार असल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. याला महाराष्ट्र कोस्टल झोन प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. मात्र सदर प्रकल्प उंच पिलर्सवरून जाणार असल्यामुळे खारफुटीची तोड कमी प्रमाणात होईल. तसेच नवी मुंबईत खारफुटी तोडण्यात येणार नसून पुराचे पाणी नवी मुंबई शहरात घुसण्याचं प्रश्नच उदभवत नसल्याचे अजब खुलासा परिवहनमंत्री रावते यांच्याकडून करण्यात आला आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला ठाणे पालघर जिल्ह्यात जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. मात्र आता त्यांना योग्य मोबदला देण्याची माहिती देण्यात आली असून शेतकरी त्याबदल्यात जमिनी देण्यास पुढे येत आहेत असे रावते यांनी सांगितले.

Intro:मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नवी मुंबईतील 13.36 हेक्टर जमिनीवरील 54 हजार खारफुटींच्या झाडांची तोडणी करण्यात येणार आहे. ही सत्यतता असली तरी त्याऐवजी पाच पट झाड लावण्यात येतील असे स्पष्टीकरण परिवहन विभाकडून देण्यात आले आहे.
शिवसेनेच्या विधानपरिषदेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधानपरिषदेत लेखी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी लेखी उत्तर दिले आहे.Body:बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी खारफुटीच्या झाडांची मोठया प्रमाणात तोडणी करण्यात येणार असल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. याला महाराष्ट्र कोस्टल झोन प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. मात्र सदर प्रकल्प उंच पिलर्सवरून जाणार असल्यामुळे खारफुटीची तोड कमी प्रमाणात होईल. तसेच नवी मुंबईत खारफुटी तोडण्यात येणार नसून पुराचे पाणी नवी मुंबई शहरात घुसण्याचं प्रश्नच उदभवत नसल्याचे अजब खुलासा परिवहनमंत्री रावते यांच्याकडून करण्यात आला आहे.Conclusion:मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला ठाणे पालघर जिल्ह्यात जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. मात्र आता त्यांना योग्य मोबदला देण्याची माहिती देण्यात आली असून शेतकरी त्याबदल्यात जमिनी देण्यास पुढे येत आहेत असे रावते यांनी सांगितले.
Last Updated : Jun 26, 2019, 8:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.