अकोला - कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 12 रुग्ण पॉझेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अकोल्यातील एकूण रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे.
आज एकूण 54 जणांचे कोरोनाचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 12 रुग्ण पॉझिटिव्ह तर 42 जण निगेटिव्ह आढळले आहेत. यापैकी 2 महिलांचा अहवाल मृत्यूनंतर पॉझेटिव्ह आला आहे.
दरम्यान, रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अकोलेकरांमध्ये चिंता वाढली आहे. मात्र, प्रशासनाकडून वारंवार घराबाहेर न पडण्याचे आवाहन केल्यानंतरही लोक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.