ETV Bharat / state

Nitin Yadav Sketch : स्केचमुळे फरार 500 गुन्हेगार गजाआड; आरोपींना शोधण्यात 'त्यांचा' मोलाचा वाटा - स्केचच्या आधारे गुन्हेगार अटक

गुन्हे करून पसार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी स्केच आर्टिस्ट नितीन यादव (sketch artist Nitin Yadav) यांच्या स्केचचा मोठा उपयोग पोलिसांना (Police benefit from Nitin Yadav sketch) होतो. मुंबई 2013 साली झालेला शक्ती मील गॅंग रेप गुन्हा हा संपूर्ण देशभर गाजला होता. (Criminal arrested based on sketch) यामध्ये नेमके गुन्हेगार कोण हे पोलिसांना आधी समजत नव्हतं त्यावेळेस देखील पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी सर्वात आधी नितीन यादव यांची आठवण झाली. मध्यरात्री दोन वाजता नितीन यादव (Nitin Yadav sketch) यांनी शक्तीमिल गॅंग रेप प्रकरणातील आरोपीचे रेखाचित्र रेखाटले होते. latest news from Mumbai, Mumbai Crime

Nitin Yadav sketch artist
स्केच आर्टिस्ट नितीन यादव
author img

By

Published : Nov 19, 2022, 5:26 PM IST

मुंबई : फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी नितीन यादव यांच्या स्केचचा मोठा उपयोग पोलिसांना (Police benefit from Nitin Yadav sketch) होतो. त्यांनी काढलेल्या स्केचच्या जोरावर आजवर पोलिसांनी साडेचारशे ते पाचशे गुन्हेगार पकडले (Criminal arrested based on sketch) आहेत. म्हणूनच पोलीस नसूनही पोलिसांएवढीच महत्त्वाची कामगिरी करणारे नितीन यादव (Nitin Yadav sketch) आहेत. latest news from Mumbai, Mumbai Crime

स्केच आर्टिस्ट नितीन यादव त्यांचे अनुभव सांगताना

पोलिसांच्या मदतीला धावून जातात नितीन यादव - सराईत गुन्हेगार गुन्हा करत असताना आपल्या मागे पुरावा राहणार नाही याची दक्षता घेत असतो. आपण केलेल्या कुकृत्याचा पोलिसांना छडा लागू नये, आपली ओळख पोलिसांना होऊ नये यासाठी गुन्हेगार वेगवेगळ्या युक्त्या करत असताता. मात्र कोणत्या ना कोणत्या रूपाने गुन्हेगार पुरावा हा मागे सोडत असतो आणि त्या पुरावाच्या आधारावरच पोलीस मग त्या गुन्हेगाराचा मागोवा घेतात. त्या गुन्हेगाराला असेल तेथून अटक करून पोलीस कोठडीत पाठवत असतात. मात्र अनेक वेळा वेगवेगळ्या गुन्ह्यात गुन्हेगार नेमका कोण आहे ? हेच पोलिसांना समजत नाही. अशावेळी पोलिसांच्या मदतीसाठी धावून येतात ते नितीन यादव.

आतापर्यंत पाच हजार स्केचचा रेकॉर्ड- नितीन यादव हे स्केच आर्टिस्ट आहेत. एखाद्याने वर्णन केलेल्या व्यक्तीचे हुबेहूब स्केच तयार करण्याची प्रतिभा नितीन यादव यांच्यामध्ये आहे. त्यामुळे अनेक वेळा पोलिसांसाठी किचकट ठरू पाहणाऱ्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी नितीन यादव हे पोलिसांच्या मदतीला धावून आले आहेत. गुन्हेगार गुन्हा करून गेल्यानंतर अनेक वेळा पोलिसांकडे त्यांचे छायाचित्र नसते किंवा तो गुन्हेगार कोणत्याही सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला नसतो. त्या गुन्हेगाराचा कोणताही पोलीस रेकॉर्ड नसल्याने नेमका गुन्हेगार कोण? तो कसा दिसतो ? आणि त्याला शोधायचे कसे? असे आवाहन पोलिसांसमोर उभे असताना संबंधित गुन्हेगाराला कोणी साक्षीदाराने पाहिले असल्यास त्या साक्षीदाराच्या वर्णनावरून नितीन यादव त्या गुन्हेगाराचा उपयोग स्केच तयार करतात. त्या स्केचच्या आधारावर पोलिसांना अनेक वेळा तो गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारास पकडण्यात यशस्वी होतात. नितीन यादव यांनी आजपर्यंत अशा प्रकारे पाच हजारच्या वर स्केच काढून वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आरोपीला पकडण्यात पोलिसांची मदत केली आहे. यामध्ये आतापर्यंत साडेचारशे ते पाचशे गुन्हेगार या स्केटच्या आधारावर पकडले गेले आहेत.

मोठ्या गुन्ह्यात नितीन यादव यांची पोलिसांना मदत - नितीन यादव यांनी आजपर्यंत 5000 च्या वर गुन्ह्यांमध्ये स्केच काढून पोलिसांना मदत केली आहे. यामध्ये गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगार देखील आहेत त्यामुळे पोलिसांची मदत करणाऱ्या नितीन यादव यांना अनेक वेळा गुन्हेगारांकडून धमक्याही आले आहेत. मात्र अशा धमक्यांना आपण भीक घालत नाही. पोलिसांना मदत करण्याचं काम हे आपण अविरतपणे सुरूच ठेवणार असल्याचं नितीन यादव ईटीव्ही भारत शी बोलताना सांगतात. मुंबई 2013 साली झालेला शक्ती मील गॅंग रेप गुन्हा हा संपूर्ण देशभर गाजला होता. यामध्ये नेमके गुन्हेगार कोण हे पोलिसांना आधी समजत नव्हतं त्यावेळेस देखील पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी सर्वात आधी नितीन यादव यांची आठवण झाली. मध्यरात्री दोन वाजता नितीन यादव यांनी शक्तीमिल गॅंग रेप प्रकरणातील आरोपीचे रेखाचित्र रेखाटले होते. एकूण तीन गुन्हेगारांचे रेखाचित्र त्यांनी पहाटेपर्यंत रेखाटली. आणि त्यानंतर पुढील तपासाला सुरुवात झाली होती. त्यानंतर २०१२ साली बांद्रा येथे परदेशी मुलीचा बलात्कार मुंबई झाला होता. जगभरात या केस बाबत चर्चा सुरू होती. परदेशी नागरिक मुंबई आणि देशांमध्ये सुरक्षित नाहीत असं वातावरण जगभरात निर्माण होण्याची शक्यता असतानाच, त्यावेळी देखील त्या गुन्हेगाराचा कोणताही सुगावा पोलिसांकडे नसताना नितीन यादव यांनी काढलेल्या रेखा चित्राच्या आधारावर त्या रेप केस मधल्या आरोपीला पकडण्यात आले होते. एवढेच नाही तर पुण्यामध्ये झालेला जर्मन बेकरी बॉम्ब ब्लास्ट प्रकरण आणि देशभर अजूनही गाजत असलेलं नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात देखील नितीन यादव यांनी स्केच काढून गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना मदत केली होती.

अशी झाली स्केच काढण्याची सुरुवात - नितीन यादव यांना लहानपणापासूनच चित्र काढण्याची आवड होती. नितीन यादव यांची आई ईराबाई महादेव यादव या घरी खूप छान विणकाम करायचा ते विणकाम नितीन यादव हे लहानपणापासूनच पाहत आले यासोबतच त्यांचे वडील महादेव शंकर यादव हे मिल कामगार होते. त्यावेळी कुर्ल्यात घरी राहत असताना मिल कामगार संबंधी लिहावे लागणारे फलक हे नितीन यादव आपल्या सुरेख अक्षरात लिहत होते. यासोबतच नितीन यादव यांचे वडील राजकारणात सक्रिय असल्याने मुंबई प्रचारासाठी भिंतीवर चित्र काढणे, पक्षाचा प्रचार करणे यासाठीची काम नितीन यादव करत होते. यातूनच त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांची प्राथमिक शाळा गणेशबाग महानगर पालिका येथे त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यातले कलागुण ओळखून त्यांच्या चित्रकले ला वाव दिला आणि तिथूनच नितीन यादव हे चित्रकला क्षेत्रात वळले.

स्केच आर्टिस्ट क्षेत्रात असे झाले पदार्पण- घरी हालाखीची परिस्थिती होती. आई वडील यांच्यासह तीन भाऊ तीन बहिणी असा आठ लोकांचे त्यांचे कुटुंब होते. या हालकीच्या परिस्थितीत कसं कसं आपलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट येथे नितीन यादव यांनी शिक्षण घेतलं. त्या तिथे त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केलं. यासोबतच गाड्यांचे नंबर प्लेट घरावरची नेमप्लेट असं रंगवण्याचा कामही नितीन यादव करत होते असंच एकदा कुर्ला पोलीस स्टेशनमध्ये जवळपास १९८२ साली नाम फलकाचे काम करत असताना. एक गुन्हा घडला. GSK हॉटेल मध्ये एक खूण झाला होता. खुन्याला हॉटेलमधील वेटर काम करणाऱ्या तरुणाने पाहिलं होत या गुन्ह्यामध्ये साक्षीदार गुन्हेगाराचा वर्णन सांगू शकत होता. मात्र स्केच तयार करायचा कसा असा प्रश्न पोलिसांसमोर असताना आपण स्केच तयार करू शकतो असं पोलिसांना नितीन यादव यांनी सांगितलं. आणि त्यावेळेस संबंधित साक्षीदाराने सांगितलेल्या वर्णनावरून नितीन यादव यांनी हुबेहूब गुन्हेगाराचा चित्र रेखाटलं त्या चित्राच्या आधारावर पोलिसांनी त्या गुन्हेगाराला देखील पकडल. त्यानंतर नितीन यादव यांचा हा प्रवास सुरू झाला. मात्र यासाठी नितीन यादव यांनी कधीही मोबदला घेतला नाही. नितीन यादव अजूनही कुर्ल्याच्या त्यात परिसरात राहतात मात्र आता मुंबईच नाही तर राज्यभरातून आणि राज्याच्या बाहेरून पोलीस नितीन यादव यांची मदत घेण्यासाठी मुंबईत येतात. त्यांनी काढलेले रेखाचित्र हे आरोपीच्या अत्यंत जवळ जाणाऱ्या असते. त्यामुळेच आजच्या तांत्रिक युगात देखील नितीन यादव यांनी आपल्या हाताने काढलेला स्केच हा तंत्रज्ञानालाही मागे टाकतो. म्हणूनच तपास यंत्रणा नितीन यादव यांना या तांत्रिक युगात देखील त्यांच्या हाताने काढलेल्या स्केचवर अधिक विश्वास ठेवतात.

पोलिसांनी शैक्षणिक खात्याकडून 164 पुरस्कार - नितीन यादव यांच्या कामाचा खरा कस लागतो तो संवेदनशील प्रकरणांमध्ये. बलात्कार पिडीत मुलीकडून गुन्हेगाराची माहिती काढून घेणे हा काहीसा क्रूर पण अपरिहार्य भाग असतो. अशा केसेस मध्येही नितीन यादव यांनी सफाईने माहिती काढून घेतली आहे. त्यांच्या कामासाठी त्यांना मुंबई पोलीस खाते व शैक्षणिक खात्याचे मिळून 164 पुरस्कार मिळाले आहेत. शक्ती मिल रेप केस नंतर स्वतः मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनीही नितीन यादव यांचा गौरव केला होता. जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिक्षण घेताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील त्यांच्यासोबतच तिथे शिकत होते आजही राज ठाकरे नितीन यादव यांना चित्रकार म्हणून ओळखतात. अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी राज ठाकरे नितीन यादव यांना चित्रकार म्हणूनच हाक मारतात असा आवर्जून नितीन यादव सांगतात. आता नितीन यादव स्वतः चित्रकलेचे धडे विद्यार्थ्यांना शिकवतात. ते राहत असलेल्या कुर्ला या ठिकाणी चित्रकला क्षेत्रात नाव कमावणाऱ्या उदयनुक तरुण आणि बालकांना शिकवण्याचं काम करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.