मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाने टाळेबंदी लागू केली आहे. मात्र, काही उत्साही नागरिक स्वतःची वाहने घेऊन त्यावर बनावट स्टीकर व बोधचिन्ह वापरून रस्त्यावर येत आहेत, अशा शंभर वाहन चालकांवर पूर्व उपनगरातील विविध पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दोन दिवसात धडक कारवाई केली.
दरम्यान, कालपासून पोलिसांनी शंभर वाहनधारकांवर धडक कारवाई केली आहे. तर यात 69 लोकांना अटक करून 50 वाहने जप्त करण्यात आली आहेत. यात ऑटो रिक्षा व चारचाकीचा समावेश आहे. या कारवाईने काही भागातील रस्त्यांवर येणारे अनावश्यक वाहने कमी झाली आहेत, अशी माहिती ट्रोम्बे विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत देसाई यांनी दिली.
हेही वाचा - 'असे' ओळखा बनावट सॅनिटायझर्स