मुंबई : बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत असताना बसचा ताफा कमी होत आहे. बेस्टमध्ये ३ हजाराहून अधिक बस आहेत. त्यामधील अर्ध्या बस सध्या भाडेतत्वावरील आहेत. बेस्टची शान असलेल्या ४५ डबल डेकर बस आहेत. त्याचे आयुर्मान संपले असल्याने त्या लवकरच भंगारात जाणार आहेत. यासाठी बेस्टने आपल्या ताफ्यात नवीन ९०० एसी डबल डेकर बसेस (900 AC double decker buses) समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात २०० बसेस दाखल होणार असून अशोक लेलॅंड कंपनीच्या या बसेस आहेत. या बसची आसन क्षमता ५४ प्रवाशांची आहे.
५ बस येणार : लंडनमधील डबलडेकर बसच्या धर्तीवर ही बस असणार आहे. डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बसमध्ये (double decker AC electric bus) दोन्ही बाजूने प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा मिळणार आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्हीची सुविधा देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बस या पर्यावरणपूरक असून आहेत. पहिल्या ५ इलेक्ट्रिक (5 AC double decker buses) वातानुकूलित डबल डेकर बस जानेवारी अखेरपर्यंत बेस्टच्या ताफ्यात सामील होणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत आणखी २५ एसी डबलडेकर बस ताफ्यात दाखल होतील.
९०० एसी ईलेकट्रीक डबलडेकर : बेस्टच्या ताफ्यात ९०० एसी ईलेकट्रीक डबलडेकर बसेस आणल्या जाणार आहेत. त्यापैकी ५ एसी डबलडेकर बसेस जानेवारीच्या अखेरीस बेस्टच्या ताफ्यात येतील. पुढील वर्षी डिसेंबर २०२३ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात ९०० एसी डबलडेकर बसेस दाखल होतील. तसेच २१०० सिंगलडेकर इलेक्ट्रिक एसी बसेस दाखल होतील अशी माहिती लोकेश चंद्र यांनी दिली.
जुलै पर्यंत ५०० टॅक्सी : मुंबईमधील ओला, उबेरची तसेच काळी पिवळी टॅक्सीचा मुकाबला करण्यासाठी बेस्ट स्वतःची टॅक्सी सेवा उपलब्ध करून देणार आहे. या सर्व टॅक्सी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या असल्याने त्याचे भाडे इतर टॅक्सी सेवांच्या तुलनेत कमी असेल. येत्या जुलै पर्यंत बेस्टकडून ५०० टॅक्सी सुरु (500 taxis will be launched from BEST) केल्या जातील. यामुळे सध्या जे नागरिक आपल्या स्वतःच्या गाड्या घेऊन घराबाहेर पडत आहेत त्याचे प्रमाण कमी होऊन ट्रॅफिकची समस्या काही प्रमाणात कमी होईल असे लोकेश चंद्र यांनी सांगितले. बेस्टच्या (BEST) ताफ्यातील बसेस : बेस्टच्या मालकीच्या बसेस - १८५४, भाडेतत्वावरील बसेस - १७९३, एकूण बसेस - ३६२७