ETV Bharat / state

विशेष : मुंबईत १२०० कोटी खर्चून ४९० रस्त्यांची कामे होणार; महानगरपालिकेची माहिती - मुंबई रस्ते बांधणी बातमी

मुंबई महापालिकेने ४९० रस्त्यांची कामे हाती घेतली असून त्यासाठी पालिका तब्बल १२०० कोटी रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती पालिकेच्या रस्ते विभागाकडून देण्यात आली आहे.

mumbai Municipal Corporation road news
mumbai Municipal Corporation road news
author img

By

Published : Aug 16, 2021, 5:11 PM IST

मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यानंतर पुढील पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे केली जातात. यात सिमेंट आणि डांबरी रस्त्यांचे काम करण्यात येते. यावर्षी मुंबई महापालिकेने ४९० रस्त्यांची कामे हाती घेतली असून त्यासाठी पालिका तब्बल १२०० कोटी रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती पालिकेच्या रस्ते विभागाकडून देण्यात आली आहे. यावर रस्त्यांचा दर्जा चांगला असण्याची गरज आहे. ज्या रस्त्यांवर खड्डे पडतील, त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली आहे.

१२०० कोटींची कामे -

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईमधील रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने पालिकेने दर्जेदार रस्ते बनण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बहुतेक रस्ते हे काँक्रीटचे केले जात आहे. तसेच जे रस्ते डांबरी केले जात आहेत, त्यात प्लास्टिकचा वापर करावा, असे निर्देश पालिका प्रशासनाकडून कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. मुंबईत १९४१ किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यामधील १५७ किलोमीटर लांबीच्या ४९० रस्त्यांची कामे पालिकेने यंदा हाती घेतली आहेत. त्यात १४५ सिमेंट काँक्रिट आणि १२ किमी डांबरी रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. विकास आराखडा २०३४ मध्ये मुंबई शहरामध्ये पडणारा मुसळधार पाऊस आणि सतत वाढणारी वाहतूक याचा विचार करून रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. पालिकेच्या सन २०२१-२२च्या अर्थसंकल्पात रस्ते कामांसाठी १ हजार ८०० कोटींची तरतूद केली असून १ हजार २०० कोटींच्या निविदा रस्तेबांधणीसाठी काढण्यात आल्या आहेत. १ ऑक्टोबरपासून नवीन रस्त्यांची कामे सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

पालिकेतील रस्ते घोटाळा -

मुंबईमध्ये दरवर्षी रस्ते कामांसाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. तरीही दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडण्याची समस्या कायम आहे. रस्त्यांच्या निकृष्ट बांधकामाबाबत २०१६ मध्ये तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र दिले होते. महापौरांच्या पत्रानुसार पालिका आयुक्तांनी २०० रस्त्यांच्या कामांची चौकशी केली असता त्यापैकी ३४ रस्त्यांच्या कामात घोटाळा उघडकीस आला होता. याप्रकरणी काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते. तसेच काही कंत्राटदार आणि पालिकेच्या अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे नोंदवून तुरुंगाची हवा खावी लागली होती.

रस्ते कामासाठी २४ वर्षात २१ हजार कोटी खर्च -

मुंबई महापालिका दरवर्षी अर्थसंकल्पात रस्तेकामांसाठी सुमारे दोन हजार कोटींची तरतूद करते. यात नवीन सिमेंट काँक्रीट आणि डांबरी रस्ते बांधले जातात, तसेच जुन्या रस्त्यांची डागडुजी केली जाते. सन १९९७ ते २०२१ या २४ वर्षात रस्ते बांधणीवर तब्बल २१ हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेने भाजपाचे आमदार अमित साटम यांना माहितीच्या अधिकारात दिली आहे. यामध्ये २०१४-१५ मध्ये सर्वाधिक ३२०१ कोटी, तर पुढच्या वर्षी २०१५-१६ मध्ये २३०० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. २० वर्षापूर्वी वर्षाला ८० ते १०० कोटी रुपये रस्त्यावर खर्च केले जात होते. मात्र, आता हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येतो आहे.

कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका -

यावर्षी रस्ते कामासाठी २ हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यापैकी सध्या १ हजार २०० कोटींची कामे केली जात आहेत. प्रत्येक विभागात रस्त्यांची कामे होण्याची गरज आहे. रस्ते कामावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याने त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे. मुंबईत रस्त्यावर खड्डे पडत असल्याची दरवर्षीची तक्रार आहे. रस्त्यांची कामे करताना ज्या रस्त्यावर खड्डे पडतील, त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.

हेही वाचा - काबुल विमानतळावर दुर्घटना; अफगाणिस्तानातून पळण्याच्या प्रयत्नात 5 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.