मुंबई - राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. त्यामध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागन झालेले रुग्ण सापडत आहेत. मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये आतापर्यंत 47 रुग्ण सापडले आहेत. यापैकी 5 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तरीदेखील धारावीत अनावश्यक लोक गर्दी करत आहेत. प्रादुर्भाव वाढत असतानाही धारावीकरांना या गोष्टीचं गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
धारावीमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग करणं अशक्य आहे. तरी देखील या झोपडपट्टीत काळजी घेत प्रशासनाने घरोघरी कोरोनाची चाचणी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. मात्र, धारावीत वस्तू खरेदीसाठी तसेच काही लोकं अनावश्यक बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे धारावीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यास प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. हे संकट परतून लावण्यासाठी सरकार आणि प्रशासन खंबीरपणे लढत आहे. मात्र, धारावीकर त्याला साथ देत नसल्याचे दिसत आहे.