ETV Bharat / state

वंदेभारत अभियानांतर्गत मुंबईत आतापर्यंत ४२ हजार ९५८ प्रवासी परतले - वंदेभारत अभियानांतर्गत मुंबईत आले प्रवासी

वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत २९८ विमानांद्वारे ४२ हजार ९५८ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यातील मुंबईच्या प्रवाशांची संख्या १४ हजार ६११ आहे.

42 thousand 958 migrants came to Mumbai through Vandebharat Abhiyan
वंदेभारत अभियानांतर्गत मुंबईत आतापर्यंत आले ४२ हजार ९५८ प्रवासी
author img

By

Published : Jul 18, 2020, 3:53 PM IST

मुंबई - वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत २९८ विमानांद्वारे ४२ हजार ९५८ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यातील मुंबईच्या प्रवाशांची संख्या १४ हजार ६११ आहे. उर्वरीत महाराष्ट्रातील १४ हजार ९९२ आणि इतर राज्यातील १३ हजार ३५५ प्रवाशीही या अभियानांतर्गत मुंबईत दाखल झाले आहेत.

३१ जुलैपर्यंत आणखी १०५ विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षीत आहे. कोरोनाविरुद्ध शासन निग्रहाने लढत असताना परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची जबाबदारी महाराष्‍ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.

बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पाठवण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या २४ मे २०२० च्या मार्गदर्शक सुचनेनुसार आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.
इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे. वंदेभारत अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधीकरण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लि. यांच्या समन्वयाने केले जात आहे. वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

या देशातून आले प्रवासी
ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनिशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया,स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया,मियामी,व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी,दुबई,मालावी,वेस्ट इंडिज,नॉर्वे, कैरो, युक्रेन,रशिया, मादागास्कर, नायजेरिया,ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व अफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्युयॉर्क, जॉर्जिया, कामेरुन, युनायटेड अरब अमिराती, कांगो अशा विविध देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.