ETV Bharat / state

16 वर्षाचा भाचा मामाकडं आला राहायला; मामीनं केला लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल - गुन्हा दाखल

Sexual Assault On Niece: मुंबईत मामा-मामीकडं राहायला आलेल्या अल्पवयीन भाच्यावर मामीनं लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Beating niece by aunt) याप्रकरणी पीडित मुलानं त्याच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी आरोपी महिलेविरुद्ध ताडदेव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (sexually assaulting minor)

Sexual Assault On Niece
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 10:43 AM IST

मुंबई Sexual Assault On Niece: उत्तर प्रदेशातून एक सोळा वर्षांचा मुलगा मामा-मामीकडं मुंबईत राहायला आला, मात्र चाळीस वर्षांच्या मामीकडून त्या बालकावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईतील ताडदेव इथं घडलेली आहे. 1 डिसेंबर रोजी ताडदेव पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (case filed against aunt)

मामीविरुद्ध गुन्हा दाखल : पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मूळचा उत्तर प्रदेशमध्ये राहणारा सोळा वर्षांचा भाचा हा मुंबईमध्ये ताडदेव या ठिकाणी मामाकडं राहायला आला. या भाच्यावर त्याच्या चाळीस वर्षाच्या मामीनं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या ताडदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली. यामुळेच ताडदेव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याच्या अंतर्गत आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला.

मामीनं केला अत्याचार : गेल्या 1 वर्षांपासून उत्तर प्रदेश इथून सोळा वर्षांचा भाचा हा मामा-मामीकडं राहायला मुंबईत आला होता. त्याला मुंबई बघायची होती. त्यामुळं त्याला त्याच्या आई-वडिलांनी मुंबईला मामाकडं ताडदेव या ठिकाणी पाठवलं. परंतु त्याच्यावर मामी लैंगिक अत्याचार आणि मारहाण देखील करीत असे, असा दावा भाच्याकडून केला आहे.

मामीनं दिली जीवे मारण्याची धमकी : मामीनं भाच्याला मारहाण तर केली, सोबतच त्याला धमकी देखील दिली की, जर तू याबाबत कोणाला दुसऱ्याला सांगितलं, तर तुला जीवे मारलं जाईल. त्यामुळं दिवसेंदिवस मामीकडून याबाबत मारहाण देखील होऊ लागली आणि लैंगिक अत्याचार देखील होऊ लागला. या छळाला तो कंटाळला आणि आपल्या आईला त्यानं कसंबसं कळवलं.

उपाशी ठेवून अत्याचार : मामी त्याला वेळेवर जेवण देखील देत नव्हती. सुरुवातीला त्यानं या सर्व गोष्टी सहन केल्या, परंतु मामाला सांगण्याचं त्याचं धाडस झालं नाही. अखेर खूप त्रास झाल्यामुळं त्यानं आपल्या आईला कळवलं आणि नातेवाईकांनी ताडदेव पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. या प्रकरणाच्या संदर्भात ताडदेव पोलीस ठाणे इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक शेंडे यांच्या नेतृत्वात तपास सुरू आहे.

हेही वाचा:

Physical Abuse of Minors : अल्पवयीन दोन मुलांवर शौचालयात लैंगिक अत्याचार; नराधमाला बेड्या

Sexually Assaults Case : अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भावासह पोलीस पदावर कार्यरत असलेल्या एकाला अटक

Sexual Assault With Animal : लैंगिक भूक भागवण्यासाठी रेडकावर करायचा अनैसर्गिक अत्याचार; वाचा कसं फुटलं बिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.