ETV Bharat / state

मुंबईतील पश्चिम उपनगरातल्या नाल्यांमधून 39 टक्के गाळ काढला - mahadeshwar

नालेसफाईचा घोटाळा गेल्या वर्षी गाजला होता मात्र, यंदा कोणत्याही पद्धतीचा घोटाळा झालेला नसल्याचे महापौर महाडेश्वर यांनी सांगितले. दिलेल्या मुदतीत ठेकेदाराने काम केले नाही आणि योग्य ठिकाणी काढलेला गाळ टाकला नाही, तर योग्य ती कारवाई केली जाईल. कामचुकार ठेकेदाराला माफ केले जाणार नसल्याचा इशारा देखील महापौर महाडेश्वर यांनी दिला आहे.

मुंबईतील पश्चिम उपनगरातल्या नाल्यांमधून 39 टक्के गाळ काढला
author img

By

Published : May 8, 2019, 7:29 PM IST

मुंबई - पावसाळ्यापूर्वी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील नाल्यातील 39 टक्के गाळ काढून साफसफाई करण्यात आल्याचा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. मुंबईतील नाल्यातील गाळ काढण्याचे काम समाधानकारक सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. आज मुंबईच्या पश्चिम उपनगरातील नाल्यांचा पाहणी दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईतील पश्चिम उपनगरातल्या नाल्यांमधून 39 टक्के गाळ काढला

1 एप्रिलपासून पश्चिम उपनगरातील 39 टक्के नाल्यातील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मुंबईतील नाल्यातील गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिका सुमारे 154 कोटी रुपये खर्च करत आहे.

नालेसफाईचा घोटाळा गेल्या वर्षी गाजला होता. मात्र, यंदा कोणत्याही पद्धतीचा घोटाळा झालेला नसल्याचे महापौर महाडेश्वर यांनी सांगितले. दिलेल्या मुदतीत ठेकेदाराने काम केले नाही आणि योग्य ठिकाणी काढलेला गाळ टाकला नाही तर योग्य ती कारवाई केली जाईल तसेच ठेकेदाराला माफ केले जाणार नसल्याचा इशारा देखील महापौर महाडेश्वर यांनी दिला आहे. संपुर्ण मुंबईतील लहान, मोठ्या नाल्यातील 2 लाख 70 हजार मेट्रिक टन गाळ काढला असून तो वाहून नेण्यात आला आहे. तसेच 31 मेपर्यंत नाले सफाई करण्याची डेडलाईन असून 5 लाख 45 हजार मेट्रिक टन गाळ अद्याप काढायचा असल्याचे महाडेश्वरांनी सांगितले.

नाल्यातील काढलेला गाळ हा भिवंडी, वसई व रायगड येथे टाकण्यात आला आहे. पूर्ण मुंबईतील नाल्यातील 50 टक्के गाळ काढण्यात आले असल्याची माहिती पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख जल अभियंता श्रीकांत कवाले यांनी दिली.

मुख्य नाल्यातील काढण्यात आलेला आतापर्यंतचा गाळ

  • वाकोला नदी - 39 टक्के
  • मिठी नदी - 36 टक्के
  • दहिसर नदी - 32 टक्के
  • मजास आणि मोगरा नाला - 50 टक्के
  • एअरपोर्ट इर्ला नाला - 41 टक्के

पोयसर नदीतील गाळ काढण्याचे काम तीन टप्प्यात सुरू असून अनुक्रमे 34, 44 आणि 55 टक्के गाळ काढण्यात आला आहे.

Intro:पावसाळ्यापूर्वी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील नाल्यातील 39 टक्के गाळ काढून साफसफाई करण्यात आल्याचा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. मुंबईतील नाल्यातील गाळ काढण्याचे काम समाधानकारक सुरू आहे.
महापौरांनी आज मुंबईच्या पश्चिम उपनगरातील नाल्यांचा पाहणी दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते.

Body:1 एप्रिल पासून पश्चिम उपनगरातील 39 टक्के नाल्यातील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मुंबईतील नाल्यातील गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिका सुमारे 154 कोटी रुपये खर्च करतेय.
नालेसफाईचा घोटाळा गेल्यावर्षी गाजला मात्र यंदा कोणत्याही पध्दतीचा घोटाळा झालेला नसल्याचे विधान महापौर महाडेश्वर यांनी केले. दिलेल्या मुदतीत ठेकेदाराने काम केलं नाही आणि योग्य ठिकाणी काढलेला गाळ टाकला नाही तर योग्य ती कारवाई केली जाईल. ठेकेदाराला माफ केले जाणार नाही असा इशारा देखील महापौर महाडेश्वर यांनी दिला आहे.

Conclusion:
संपूर्ण मुंबईतील लहान मोठ्या नाल्यातील 2 लाख 70 हजार मेट्रिक टन गाळ काढला असून तो वाहून नेण्यात आला आहे.
31 मे पर्यंत नाले सफाई करण्याची डेडलाईन असून 5 लाख 45 हजार मेट्रिक टन गाळ अद्याप काढायचा आहे.
नाल्यातील काढलेला गाळ हा भिवंडी वसई येथे मुख्यत व रायगड येथे टाकण्यात आला आहे. पूर्ण मुंबईतील नाल्यातील 50 टक्के गाळ काढण्यात आले असल्याची माहिती पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख जल अभियंता श्रीकांत कवाले यांनी दिली.

मुख्य नाल्यातील काढण्यात आलेला आतापर्यंत गाळ
वाकोला नदी 39 टक्के
मिठी नदी 36 टक्के
दहिसर नदी 32 टक्के
पोयसर नदीतील गाळ काढण्याचे काम तीन टप्प्यात सुरू असून अनुक्रमे 34, 44 आणि 55 टक्के गाळ काढण्यात आला आहे.
मजास आणि मोगरा नाला 50 टक्के
एअरपोर्ट इर्ला नाला 41 टक्के
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.