ETV Bharat / state

कोरोना काळात मुंबईत पार पडल्या 36 हजार 141 प्रसूत्या - 36 thousand 141 deliveries in Mumbai

गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत मुंबई महालिकेच्या अखत्यारीतील पालिका, सरकारी, खासगी रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेत तब्बल 36 हजार 141 प्रसूत्या केल्या. 36 हजार 141 पैकी 19 हजार 326 नार्मल तर 13 हजार 904 सिझेरियन प्रसूत्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. यात सर्वाधिक प्रसूत्या सायन रुग्णालयात झाल्या आहेत.

प्रसुती
प्रसुती
author img

By

Published : Dec 26, 2020, 3:08 PM IST

मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनामुळे रुग्णांना हात लावण्यासही कोणीही तयार नव्हते. मात्र गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत मुंबई महालिकेच्या अखत्यारीतील पालिका, सरकारी, खासगी रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेत तब्बल 36 हजार 141 प्रसूत्या केल्या. 36 हजार 141 पैकी 19 हजार 326 नार्मल तर 13 हजार 904 सिझेरियन प्रसूत्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

कोरोनाची भीती -

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा मार्चमध्ये पहिला रुग्ण मुंबईत आढळून आला. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णाच्या संपर्कात आल्यास इतरांनाही या विषाणुची लागण होऊ शकते. या भीतीने कोरोना रुग्णांना आणि मृतदेहांना हातही लावण्यासाठी लोक भीत होते. मुंबईत भीतीचे वातावरण पसरले असताना रुग्णालये कमी पडत होती. महापालिकेच्या रुग्णालयासह खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली.

महापालिकेचा पुढाकार -

बहुतेक रुग्णालय, प्रसूतीगृहे कोरोनासाठी राखीव झाल्याने महिलांच्या प्रसूतीचा प्रश्न निर्माण झाला. कोरोनाच्या भीतीने साधा ताप आला तरी महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला जात होता. अशावेळी मुंबई महापालिकेने आपल्या नायर रुग्णालयात विशेष कक्ष सुरू केला. पालिकेच्या केईएम, नायर, सायन व कूपर रुग्णालयासह सर्वसाधारण रुग्णालये व मॅटरनिटी होममध्ये गर्भवती महिलांच्या प्रसूती करण्यास सुरुवात झाली.

36 हजार 141 प्रसूत्या -

मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. त्यावेळपासून प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांची सुरळीत प्रसूती करण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांसमोर होते. परंतु डॉक्टरांनी गर्भवती महिलांसह बाळांची विशेष काळजी घेतली. मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, सायन, कूपर रुग्णालयासह सर्वसाधारण रुग्णालये, मॅटरनिटी होम, खासगी प्रसूतीगृहांमध्ये कोरोनाच्या संकटांवर मात करत डॉक्टरांनी 36 हजार 141 प्रसूत्या केल्या. कोरोनाच्या संकटसमयी कोरोना बाधित व कोरोना निगेटिव्ह गर्भवती महिलांची प्रसूती सुरळीत पार पाडण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

सायन रुग्णालयात सर्वाधिक प्रसूत्या -

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आठ महिन्यात महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांमध्ये 36,141 प्रसूत्या झाल्या. यात 19 हजार 326 नॉर्मल तर 13 हजार 904 सिझेरियन प्रसूत्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक प्रसूत्या सायन रुग्णालयात झाल्या आहेत. सायन रुग्णालयात 2,248 सिझेरियन तर 2,133 नॉर्मल झाल्याची आकडेवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

पालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालयांमधील प्रसूत्यांची आकडेवारी -

  1. सायन रुग्णालय - सिझेरियन प्रसूती - 2,248 , नॉर्मल प्रसूती - 2,133
  2. केईएम रुग्णालय - सिझेरियन प्रसूती - 1,430 , नॉर्मल प्रसूती - 1,715
  3. वाडिया रुग्णालय - सिझेरियन प्रसूती - 1,125 नॉर्मल प्रसूती - 923
  4. कूपर रुग्णालय - सिझेरियन प्रसूती - 1,276 नॉर्मल प्रसूती - 1,468
  5. राजावाडी रुग्णालय - सिझेरियन प्रसूती - 1,065 नॉर्मल प्रसूती - 1, 462
  6. वांद्रे भाभा रुग्णालय - सिझेरियन प्रसूती - 724, नॉर्मल प्रसूती - 918
  7. कामा रुग्णालय - सिझेरियन प्रसूती - 837, नॉर्मल प्रसूती - 911

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.