ETV Bharat / state

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत 34 नवे चेहरे; तीन विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

मंगळवारी काँग्रेसने जाहीर केलेल्या 52 जणांच्या यादीत तब्बल 34 नवीन चेहऱ्यांना काँग्रेसने विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांना अत्यंत कमी मते मिळाली अशा अनेकांचा पत्ता पक्षाने कट केला आहे. तर ज्यांचा पराभव केवळ काही हजारांच्या फरकाने झाला अशा उमेदवारांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे.

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत 34 नवे चेहरे; तीन विद्यमान आमदारांना पुन्हा संधी
author img

By

Published : Oct 2, 2019, 2:33 AM IST

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 52 उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. या 52 उमेदवारांपैकी तीन विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड पश्चिम येथून तर धुळे ग्रामीण येथून कुणाल पाटील आणि चिखलीतून राहुल बोंद्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुंबईत काँग्रेसचे नेते चरणसिंग सप्रा यांना मुलुंड विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारून त्यांच्या ठिकाणी गोविंद सिंग या नवीन उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे नागपूर दक्षिणमधून सतीश चतुर्वेदी यांचेही तिकीट कापले असून या ठिकाणी गिरीश पांडव यांना संधी देण्यात आली आहे.

mumbai
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत 34 नवे चेहरे; तीन विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

हे ही वाचा - चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात महाआघाडी, मनसेने बांधली मोट, एकत्र मिळून देणार उमेदवार

मंगळवारी काँग्रेसने जाहीर केलेल्या 52 जणांच्या यादीत तब्बल 34 नवीन चेहऱ्यांना काँग्रेसने विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांना अत्यंत कमी मते मिळाली अशा अनेकांचा पत्ता पक्षाने कट केला आहे. तर ज्यांचा पराभव केवळ काही हजारांच्या फरकाने झाला अशा उमेदवारांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. यामध्ये दोन माजी मंत्र्याचा समावेश आहे. राळेगाव येथून प्रा. वसंत पुरके आणि अर्णी येथून शिवाजीराव मोघे यांना काँग्रेसने मैदानात उतरवले आहे.

हे ही वाचा - 'मुख्यमंत्री स्वतःचे गुन्हे लपवतात आणि आमची बदनामी करतात'

2014 विधानसभा निवडणुकीमध्ये कमी फरकाने पराभव झालेल्या आणि यावेळी विजयाची शक्यता असलेल्या तब्बल 15 उमेदवारांना काँग्रेसने या वेळी पुन्हा उमेदवारी दिली आहे. यामध्ये वर्धा येथून शेखर शेंडे, भिवंडी पश्चिमेतून खाँ साहेब अश्फाक, हिंगोलीतून भाऊराव पाटील, परतूर येथून सुरेशकुमार जेथलिया, जालन्यातून कैलास गोरंट्याल, वणी येथून वामनराव कासावार, आरमोरीतून आनंदराव गेडाम यांचा समावेश आहे. ज्या नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे त्यामध्ये काँग्रेसने बल्लारपूर येथून राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात डॉ. विश्वास झाडे यांना उमेदवारी दिली आहे. तर जळगाव जामोद येथून मंत्री संजय कुटे यांच्या विरोधात स्वाती वाकेकर यांना उमेदवारी दिली आहे. एकूणच काँग्रेसने यावेळी जाहीर केलेल्या उमेदवार यादीत नवीन चेहऱ्यांवर भर दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा - मी कोणत्याही चौकशीला तयार, गुन्हे लपवणाऱ्यांची न्यायालयातून माहिती मिळते; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Intro:revise :काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत 34 नवे चेहरे तर विद्यमान तीन आमदारांना पुन्हा संधी,

मुंबईत चरण सिंग सप्रा यांचाचा पत्ता कट तर नागपुरात सतीश चतुर्वेदी यांचेही तिकीट कापले

mh-mum-01-cong-2nd-list--7201153
(यासाठी फाईल फुटेज वापरावेत)

मुंबई, ता. १ :

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कडून आज ५२ उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. या 52 उमेदवारांपैकी तीन विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड पश्चिम येथून तर धुळे ग्रामीण येथून कुणाल पाटील आणि चिखलीतुन राहुल बोंद्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुंबईत काँग्रेसचे नेते चरणसिंग सप्रा यांना मुलुंड विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारून त्यांच्या ठिकाणी गोविंद सिंग या नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे नागपूर दक्षिणमधून सतीश चतुर्वेदी यांनाही तिकीट कापले असून या ठिकाणी गिरीश पांडव यांना संधी देण्यात आली आहे.
आज काँग्रेसने जाहीर केलेल्या ५२ जणांच्या यादीत तब्बल ३४ नवीन चेहरे काँग्रेसने मैदानात उतरवले आहेत. तर मागील विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांना अत्यंत कमी मते मिळाली अशा अनेकांना तिकीट नाकारून ज्यांचा पराभव केवळ काही हजाराने झाला अशा उमेदवारांना मात्र काँग्रेसने संधी दिली आहे. यात माजी दोन मंत्र्याचा समावेश आहे. यात राळेगाव येथून प्रा. वसंत पुरके आणि अर्णी येथून शिवाजीराव मोघे यांना काँग्रेसने मैदानात उतरवले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ काही हजाराने पराभव झालेल्या आणि यावेळी विजयाची शक्यता असलेल्या तब्बल पंधरा उमेदवारांना काँग्रेसने या वेळी ही उमेदवारी दिली आहे. यात वर्धा येथून शेखर शेंडे, भिवंडी पश्चिमेतून खाँसाहेब अश्फाक, हिंगोलीतून भाऊराव पाटील, परतूर येथून सुरेशकुमार जेथलिया, जालन्यातून कैलास गोरंट्याल, वणी येथून वामनराव कासावार, आरमोरीतून आनंदराव गेडाम आदींचा यात समावेश आहे. ज्या नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे त्यामध्ये काँग्रेसने बल्लारपूर येथून राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात डॉ. विश्वास झाडे यांना मैदानात उतरवले आहे तर जळगाव जामोद येथून ओबीसी विकास मंत्री संजय कुटे यांच्या विरोधात स्वाती वाकेकर यांना उमेदवारी दिली आहे. एकूणच काँग्रेसने यावेळी जाहीर केलेल्या उमेदवार यादीत नवीन चेहऱ्यांवर भर दिला असल्याचे आजच्या स्पष्ट झाले आहे.
Body:revise :काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत 34 नवे चेहरे तर विद्यमान तीन आमदारांना पुन्हा संधी,Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.