ETV Bharat / state

राज्यातील 34 ग्रामपंचायतींसाठी 9 जानेवारीला मतदान - 34 grampanchayat election

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या - अहमदनगर- 8, नाशिक- 6, ठाणे- 2, जळगाव- 7, यवतमाळ- 4, नागपूर- 2, औरंगाबाद- 2 आणि सातारा- 3 एकूण- 34.

election
राज्यातील 34 ग्रामपंचायतींसाठी 9 जानेवारीला मतदान
author img

By

Published : Dec 5, 2019, 7:07 PM IST

Updated : Dec 5, 2019, 7:32 PM IST

मुंबई - राज्यातील विविध 8 जिल्ह्यांमधील 34 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर 9 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 ला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही तारीख जाहीर केली आहे.

हेही वाचा - सोलापुरात कांद्याला देशातील विक्रमी दर, प्रतिक्विंटल 20 हजार रुपये

मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व ठिकाणी उमेदवारी अर्ज 19 ते 24 डिसेंबर 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यांची छाननी 26 डिसेंबरला होईल. उमेदवारी अर्ज 30 डिसेंबरपर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 9 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 10 जानेवारीला होणार आहे.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या -

  • अहमदनगर- 8, नाशिक- 6, ठाणे- 2, जळगाव- 7, यवतमाळ- 4, नागपूर- 2, औरंगाबाद- 2, आणि सातारा- 3 - एकूण- 34.

Intro:Body:mh_mum_sec_grp_madan__mumbai_7204684

34 ग्रामपंचायतींसाठी
9 जानेवारीला मतदान
मुंबई: राज्यातील विविध 8 जिल्ह्यांमधील 34 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 9 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 19 ते 24 डिसेंबर 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 26 डिसेंबर 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 9 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: अहमदनगर- 8, नाशिक- 6, ठाणे- 2, जळगाव- 7, यवतमाळ- 4, नागपूर- 2, औरंगाबाद- 2, आणि सातारा- 3. एकूण- 34.
Conclusion:
Last Updated : Dec 5, 2019, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.