ETV Bharat / state

Gold Smuggling Cases : देशात सोन्याच्या तस्करीत 33 टक्क्यांची वाढ; मुंबई विमानतळावर एकूण १४४ किलो सोने जप्त - सोने तस्करी मुंबई

भारतात तस्करीच्या माध्यमातून विविध देशातून सोने आणण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होताना जाणवत आहे. गेल्या सहा महिन्यात मुंबई विमानतळावर केंद्रीय महसूल गुप्तचर (डीआरआय) यंत्रणेने तब्बल 144 किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 76 कोटी रुपये इतकी आहे.

Gold Smuggling In Mumbai
सोन्याची तस्करी
author img

By

Published : May 30, 2023, 7:14 PM IST

Updated : May 30, 2023, 8:55 PM IST

सोने तस्करी प्रकरणांवर माजी आयपीएस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

मुंबई: सोने तस्करांनी तस्करीची नवी 'मोडस् ऑपरेंडी' वापरली असल्याचे 'डीआरआय' कारवाईतून उघडकीस आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये मुंबई विमानतळावर 'डीआरआय' आणि सीमा शुल्क विभागाने एकूण 604 किलो सोन्याची तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारला होता. त्या सोन्याची किंमत 360 कोटी रुपये इतकी होती.

Gold Smuggling Cases
सोने तस्करी प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे

सोन्याचे तुकडे शरीरात लपवून तस्करी: यंदा सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर या माध्यमातूनदेखील तस्करी झाली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या एका तस्करीच्या कारवाईत सोन्याचे बारीक तुकडे करून ते शरीरात लपवून आणल्याचेही दिसून आले. आजपर्यंत अंमली पदार्थ शरीरात लपवून आणून त्याची तस्करी केली जायची. मात्र, आता सोने देखील अशा प्रकारे शरीरात लपवून आणल्याचे दिसून आल्यामुळे तपास यंत्रणांचे अधिकारी चक्रावून गेले आहेत.

भारतात सोन्याची तस्करी अनेक वर्षांपासून सुरू आहे. कितीतरी पटीने सोने भारताता आयात केले जाते आणि देशांतर्गत खपविले जाते. हे बघता 'डीआरआय' आणि 'कस्टम' विभागाचे काम वाढले आहे. सोन्यावर लावण्यात आलेली ड्युटी आणि 'जीएसटी' हे यामागील मुख्य कारण आहे. - पी. के. जैन, माजी 'आयपीएस' अधिकारी

सोने वितळण्याचा कारखानाच आढळला: चालू वर्षांत म्हणजेच 2023 मध्ये आतापर्यंत सोने तस्करीच्या ज्या घटना उघडकीस आल्या. त्यापैकी बहुतांश घटनांमध्ये मुंबईतील काळबादेवी परिसरात एक रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले. या माहितीनंतर 'डीआरआय'च्या अधिकाऱ्यांनी तेथे छापेमारी करत सोने वितळवण्याचा एक छोटा कारखानाच उधळून लावला.

मुंबईत सर्वाधिक प्रकरणे: सोन्याच्या तस्करीमध्ये 33 टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. कोरोनानंतर सोन्याची तस्करीवर कारवाई करण्यात गेल्या वर्षांत मुंबई विमानतळ सर्वांत अव्वल राहिल्याचे दिसून येते. आजवर सोन्याची बिस्किटे, पत्रे किंवा लहान आकाराचे तुकडे किंवा दागिने या माध्यमातून सोन्याची तस्करी होत असे. याच कालावधीमध्ये दिल्ली विमानतळावर एकूण 374 किलो सोने पकडण्यात आले होते. त्याचप्रमाणे सोने तस्करीत चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर आहे. तेथे 306 किलो सोने पकडण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांतील सोन्याच्या तस्करीमधील ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे. विशेष म्हणजे, 2023 या वर्षामध्ये सोने तस्करीच्या अनेक नव्या कार्यपद्धती देखील अधिकाऱ्यांना समजून आल्या आहेत.

हेही वाचा:

  1. Gold Smuggling: सोन्याच्या तस्करीच्या आरोपावरून मुंबई विमानतळ कस्टम्सने केली भारतीय नागरिकाला अटक; २.२८ कोटी रुपयांचे केले सोने जप्त
  2. Gold Silver Market : दोन हजार रुपये नोटबंदीनंतर ग्राहकांचा सोने-चांदी खरेदीकडे कल
  3. Mumbai Crime : सोन्याच्या तस्करी प्रकरणी 6 परदेशी नागरिकांना अटक, मुंबई विमानतळावर कस्टम्स विभागाची कारवाई

Last Updated : May 30, 2023, 8:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.