मुंबई: देशात कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली आहे. (Increase In Drug Sales) चीनमध्ये कोरोनाने थैमान पुन्हा एकदा सुरू केल आहे. त्याचा फटका आपल्या देशात बसू नये, याची तयारी नागरिकांकडून देखील केली जात आहे. (Coronavirus disease ) कोरोना थांबवण्यासाठी लागणाऱ्या औषधांची आणि उपकरणांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. (Mumbai Corona Update ) या खरेदीत जवळपास 30 ते 40 टक्के ने वाढ झाली आहे.
कोरोनाचे सावट पुन्हा एकदा जगावर घोंगावताना दिसतंय. चीनच्या काही भागांमध्ये करोनाने पुन्हा एकदा हाहाकार वाजवलेला आहे, लाखो रुग्ण रोज नव्याने सापडत आहेत. चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या ही अत्यंत भीतीदायक असून जवळपास सर्वच देशाने या संबंधी सुरक्षा वाढवण्यासाठी पावलं उचलायला सुरू केली आहेत. चीन हा भारतालगतचा देश असल्यामुळे भारताला पुन्हा एकदा कोरोनाचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वेळच्या तीन कोरोनाच्या लाटांमध्ये देशाचं मोठं नुकसान झालं होतं. व्यवसाय, उद्योगधंदा, नोकरी अशा सर्वच क्षेत्राला याचा मोठा फटका बसला. प्रत्येक व्यक्तीला या रोगामुळे कमी अधिक प्रमाणात फटका बसत असल्याने यावेळी पुन्हा एकदा कोरोनाची चाहूल लागत असल्यामुळे भारतातही भीतीच वातावरण पाहायला मिळत आहे.
सॅनिटायझर आणि मासच्या विक्रीत 30 टक्के वाढ: 3 वर्षांपूर्वी कोरोना नेमका आहे काय? हा रोग नेमका कसा होतो ? आणि याला थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे ? याची महिती अनेकांना नव्हती. मात्र आता जागरूकता वाढली आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक औषधाकडे धाव घेत आहेत. खास करून यामध्ये सॅनिटायझर आणि मास्क सहित इतर औषधांच्या विक्रीत गेले पाच ते सहा दिवसात वाढ झाली, असल्याचे फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनचे (Drug License Holder Foundation) अध्यक्ष अभय पांडे यांनी माहिती दिली आहे. ही वाढ जवळपास 30 ते 40 टक्के एवढी आहे. गेल्या दीड वर्ष कोरोनाचे सावट कमी झाल्याकारणाने लोक निश्चित झाली होती. पूर्वीप्रमाणे सॅनिटायझर आणि मासची विक्री जवळपास 30 ते 35 टक्क्याने वाढली आहे. तर तेथेच अँटीसेप्टिक लिक्विड घेण्याचे प्रमाणही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
या औषधांची मागणी वाढली: N 95 मास्क, सॅनिटायझर, अँटीसेप्टिक लिक्विड, इम्युनिटी बूस्टर औषध, थर्मामीटर, ऑक्सी मीटर
औषधांच्या मागणीत वाढ: चीनमधून कोरोना वाढण्याच्या भीती निर्माण झाल्यानंतर मास्क सॅनिटायझर अँटीसेप्टिक लिक्विड याच्यासह इतर औषधांची मागणी वाढली आहे. गेल्या काही महिन्यात जिथे काही अँटीसेप्टिक लिक्विड बाटल्यांची सॅनिटायझरच्या बाटल्यांची मागणी मेडिकलकडून होत होती. तिथेच आता ही मागणी वाढली आहे. तसेच N 95 मास्कची आणि
इम्युनिटी बूस्टर औषधांची देखील मागणी वाढली आहे. या औषधांचा साठा मेडिकलमध्ये करून ठेवला जातो. यामुळे ड्रॅग सप्लायर यांच्याकडून या सर्व वस्तूंची मोठी प्रमाणात खरेदी सुरू झाली असून या औषध, मास्क आणि इतर उपकरणांचा ३० टक्के अधिकचा स्टॉक करण्यात आला असल्याचे अभय पांडे यांनी सांगितला आहे.
देशात रुग्ण वाढण्याची शक्यता: याआधी 3 कोरोनाच्या लाटा देशात येऊन गेले आहेत. मात्र लाटा येण्याआधी आशियातील इतर देशांमध्ये कोरोना चांगलाच फोफावला होता. खास करून चीनमध्ये करोडा मोठ्या संख्येत प्रसारित होत असताना त्याच्या जवळपास 30 ते 35 दिवसानंतर त्याचं संक्रमण भारतामध्ये झालेलं पाहायला मिळालं. सध्या चीनमध्ये पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील महिन्याभरानंतर देशात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज देशातील प्रत्येक राज्यात अत्यंत कमी प्रमाणात रुग्ण संख्या आढळत असली, तरी पुढील काही दिवसात हा आकडा जलद गतीने वाढण्याची शक्यता आहे.
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची आवश्यकता: आपल्या देशात शेकडो वर्षापासून आयुर्वेदामुळे भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती ही जन्मजात अधिक असते, हे आयुर्वेदाने या आधीही स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच याआधी आलेल्या कोरोना लाटांचा फटका ज्या तीव्रतेने इतर देशांच्या नागरिकांना बसला, त्या पद्धतीत भारतामध्ये तो बसलेला नाही. याच कोरोनाच्या काळात पुन्हा एकदा भारतीय आयुर्वेद किती महत्त्वाचा आहे, हे जगाला पटवून दिलं. त्यामुळेच पुन्हा एकदा कोरोनाचे सावट दिसत असताना नागरिकांनी आयुर्वेदाचे महत्व ओळखलं पाहिजे, असा संदेश आयुर्वेद डॉक्टर मंगेश ठमके यांनी दिला आहे.
या आयुर्वेदिक पद्धतीचा अवलंब करावा: आपल्या अवतार भूतांचं वातावरण शुद्ध आणि निरोगी राहावं यासाठी आयुर्वेदात विशेष महत्त्व दिलं गेला आहे. यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर शुद्ध आणि स्वच्छ ठेवण्यासाठी धूपन चिकित्साचा वापर करण्यात यावा. चवनप्राश सेवन करण्यात यावे, नाकावाटे आयुर्वेदिक औषधी तेल घ्यावे ( नस्से चिक्तीसा), भारतीय जीवन पद्धतीचा अवलंब अति आवश्यक. यामध्ये वेळेवर झोपणे वेळेवर उठणे, योग्य वेळी योग्य आहार घेणे, व्यायाम करणे या क्रिया नियमित सुरू ठेवल्यास कोणत्याही रोगापासून दूर राहता येते. या सर्व क्रिया दिनचर्यात समाविष्ट केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्यावर होणार नाही, असे मत देखील आयुर्वेदिक डॉक्टर मंगेश ठमके यांनी व्यक्त केला आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात सापडत असले, तरी हा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मेडिकल आयुर्वेद आणि या क्षेत्राला पुरवठा करणाऱ्या कंपन्या मात्र पुढील धोका लक्षात घेऊन तयार झाले आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी औषध साठ्यांचा घेतला आढावा: गेल्या चार-पाच दिवसापासून वाढत असलेल्या औषधाच्या मागणीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवी यांनीही याबाबतचा आढावा घेतला आहे. प्रत्येक राज्यात मुबलक औषधांचा मागचा सॅनिटायझरचा साठा उपलब्ध बाबत आज आढावा घेतला असून, या आढाव्यासाठी मेडिकल असोसिएशन, औषध निर्मित करणाऱ्या कंपन्या यांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. तसेच औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा या सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.