ETV Bharat / state

Mumbai Property Prices: मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या; २४० कोटी रुपयांत ३0 हजार स्क्वेअर फूटच्या अपार्टमेंटची खरेदी - मुंबईत जागेच्या किमती

मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वरळी येथील वसंत रोडवर असलेल्या स्काय किपर इमारतीत तीस हजार स्क्वेअर फुटचे पेंट हाऊस वेल स्पून ग्रुपचे चेअरमन बी. के. गोंयका यांनी विकत घेतले. याचा बाजार भाव किंमत अंदाजे २४० कोटी रुपये एवढी आखली जात आहे. या इमारतीच्या ६३, ६४ आणि ६५ मजल्यावर मिळून हे ३० हजार स्क्वेअर फुटचे पेंट हाऊस आहे.

Mumbai property prices
मुंबईतील मालमत्तेच्या किमती
author img

By

Published : Feb 10, 2023, 1:27 PM IST

मुंबई : मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. त्यामुळे देशभरातूनच नाहीतर जगभरातून लोक मुंबईकडे आकर्षिले जातात. मुंबई शहरात रोज लाखोंनी लोक व्यवसाय, काम, धंद्यानिमित्त येतात. जगात सर्वात जलद गतीने तेच होणाऱ्या शहरांमध्ये मुंबईची गणना केली जाते. अत्यंत जलद गतीने विकसित होणाऱ्या अशा या मुंबई शहरात एक छोटसे घर घेणे, हे अनेकांचे स्वप्न असते. जगामध्ये सर्वात जास्त घरांच्या किमती असलेल्या शहरांमध्ये मुंबई हे एक शहर आहे. त्यामुळे या शहरात घर घेणे, अनेकांचे स्वप्न असले तरी ते सर्वांचेच पूर्ण होत नाही. कारण मुंबईत घराच्या किमती झपाट्याने वाढत आहे. तसेच जगभरातील आणि देशभरातील व्यवसायिक मुंबई आपल्या संस्थेचे कार्यालय यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करतात.

सगळ्यात मोठा व्यवहार : मुंबईमध्ये स्क्वेअर फुटाची जागा हजारो रुपयांमध्ये विकली जाते. मुंबईतील घरांची किंमत अनेक वेळा कोट्यावधी रुपयांमध्ये असलेली पाहायला मिळते. मुंबईत घर, कार्यालय ही विकत घेतली जातात, त्यापैकी सगळ्यात मोठा व्यवहार म्हणून या खरेदीकडे पाहिले जाते. याच इमारती शेजारी खरेदी करण्यात आलेल्या आपर्टमेंटची किंमत देखील २४० कोटींच्या आसपास सांगण्यात येत आहे. ओबेरॉय रियल्टीने ही मालमत्ता विकसित केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ओएसिस रियल्टी या भागीदारी कंपनीने विकत घेतले आहे.

वरळीत जागेच्या किमती : मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घरांची आणि कार्यालयाची किंमत कोठ्यावधीमध्ये आहे. यामध्ये दक्षिण मुंबई, वरळी, दादर, वांद्रे, पाली हिल या परिसरात घरांची आणि कार्यालयांची किंमत नेहमीच गगनाला भिडलेला पाहायला मिळते. कोरोनाच्या काळानंतर आता पुन्हा एकदा रिअल इस्टेट व्यवसायाला मोठी चालना मिळत आहे. यातच इमारतीच्या बांधकामाला लागणाऱ्या सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्यातच मुंबईत जागेच्या किमती या खूप जास्त महाग आहेत. त्यामुळे मुंबईत याआधीही कोट्यावधी रुपयांची घर आणि कार्यालय विकली गेली आहेत. त्यातच वरळी हे मुंबईतील अत्यंत मोक्याचे आणि महत्त्वाचे ठिकाण आहे.

मालमत्ता खरेदीची चर्चा : सिलिंग समुद्रकिनारा आणि कनेक्टिव्हिटी हे सर्व पाहता वरळीत जागेच्या किमती, या मुंबईतील सर्वात महाग किमतींपैकी एक असल्याचे मत विकासक राजेंद्र सावंत यांनी व्यक्त केले आहे. या आधी ही मुंबईत वेळोवेळी अपार्टमेंटची खरेदी विक्रीनंतर, त्यांच्या किमतीबाबत चर्चा झालेल्या पाहायला मिळाल्या. २०१५ मध्ये जिंदाल कुटुंबाने १ हजार स्केवर फूट अपार्टमेंट १६० कोटी रुपयांमध्ये घेतल्याची चर्चा होती. २०२२ मध्ये कलाकार रणवीर सिंग यांनी वांद्रे येथे ११९ कोटी रुपयांचे घर खरेदी केले होते. या मालमत्ता खरेदीची देखील वेळोवेळी चर्चा मुंबईसह देशभर झालेली पाहायला मिळाली होती.

हेही वाचा : Kidney Donation: आधुनिक काळातील सावित्री! एचआयव्हीग्रस्त पत्नीने केली एचआयव्हीग्रस्त पतीला किडनी दान; जगातील पहिलीच घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.