मुंबई - हर्बल पावडर व कच्चे वैद्यकीय साहित्य देण्याच्या नावाखाली तब्बल 4 कोटी 95 लाख 4 हजार रुपयांचा चुना लावणाऱ्या 3 आरोपींना मुंबईच्या चेंबूर पोलिसांनी अटक केलेली आहे. अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी सलीम शेख याच्या चौकशीत सदरचे गुन्हे 3 नायजेरियन नागरिकत्व असलेल्या व्यक्तींसोबत मिळून केल्याचे समोर आलेले आहेत.
हर्बल पावडर, कच्चे वैद्यकीय साहित्य देण्याच्या नावाखाली फसवणूक
या प्रकरणातील आरोपी मोहम्मद हुसेन उर्फ तुकाराम शेख याने कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगून चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशनगर येथे एक कार्यालय दोन महिन्याच्या भाडेतत्वावर घेतले होते. सदर या कार्यालयाच्या करारनामावर त्याने बँक खाते उघडून आधार व जीएसटी सारख्या नोंदणी करून तशा प्रकारची कागदपत्रे मिळाली होती. या कार्यालयाच्या माध्यमातून कोरोना काळात ऑनलाइन हर्बल पावडर, कच्चे वैद्यकीय साहित्य देण्याच्या नावाखाली भारतातील विविध लोकांकडून वेगवेगळी आमिषे दाखवून तब्बल 4 कोटी 95 लाख 4 हजार रुपयांचे व्यवहार करून त्यांची फसवणूक केली होती. पोलिसांनी आतापर्यंत 10 पैकी 3 आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये 8 लाख 25 हजार रुपयांची रोकड ही गोठवली आहे. आतापर्यंत 64 लोकांच्या बँक खात्यातून आरोपींच्या बँक खात्यामध्ये सदरची रक्कम आल्याचं पोलीस तपासात समोर आलेला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर बांद्रा पोलीस ठाणे, नेहरूनगर पोलीस ठाणे व ओरिसा येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
हे आरोपी फरार
फरार आरोपींमध्ये व्यंकटेश नाडर, आरिफ शेख, लालजी, जेरी संडे, एडवर्ड, चार्ल्स या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत मोहम्मद हुसेन उर्फ शिवाजी तुकाराम बानगुडे (51), लाल बुद्ध रामकुर्मी (43) व सलीम अनवरुद्दीन शेख (39) या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे