'जय श्रीराम' न बोलल्याने शिक्षकाला चालत्या ट्रेनमधून ढककले
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये 'जय श्रीराम' न म्हटल्याने एका मदरसा शिक्षकाला ट्रेनमधून धक्का मारून बाहेर फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संदर्भात शिक्षकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मोहम्मद शाहरूख असे या शिक्षकाचे नाव आहे. वाचा सविस्तर -
गावात वीज नसल्याची शेतकऱ्याची तक्रार, वीजवितरण अधिकारी म्हणाला... 'फाशी घे'
बुलडाणा - गावात तीन दिवसांपासून वीज पुरवठा नसल्याने शेतकऱ्याने याबाबत वीजवितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र तक्रार निवारण करण्याऐवजी अधिकाऱ्याने त्या शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ केली. इतकेच नव्हे, तर वीज नाही, तर मग फाशी घे, असा अनाहूत सल्लाही दिल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मेहकर तालुक्यातील भोसा गावात घडली आहे. धनंजय खंडारकर असे संबंधित शेतकऱ्याचे नाव असून दीपक मालोकार असे त्या शिवीगाळ करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. वाचा सविस्तर -
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये 191 कोटींचा गैरव्यवहार; संस्थांकडून वसुली सुरू
मुंबई - गेल्या दहा वर्षांत विविध शैक्षणिक संस्थांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीत शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. आदिवासी विभागांतर्गत २००१ ते २०१० या कालावधीत राज्यातील शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांनी तब्बल १९१ कोटींचा गैरव्यवहार केला असल्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी लेखी उत्तरात मान्य केले आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न दाखल केला होता. वाचा सविस्तर -
बळीराजासोबत एक दिवस : पिढ्यांन पिढ्या गेल्या मात्र, समस्या 'जैसे थे'! व्यथा चंद्रपूरच्या शेतकरी कुटुंबाची...
चंद्रपूर - जंगलालगत असलेल्या वांझोट्या जमिनीवर काबाडकष्ट करुन मशागत केली. जमिनीत घाम गाळून तिला पिकवण्यायोग्य करण्यासाठी त्यांच्या पिढ्यांन पिढ्या झिजल्या. मात्र, अजूनही या काळ्या आईच्या लेकरांना उपऱ्यासारखेच जीवन जगावे लागत आहे. ही व्यथा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील अनिल लटारी गोयलसारख्या अनेक शेतकऱ्यांची...ज्यांनी या जमिनीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले... त्याच व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय 'ईटीव्ही भारत'ने बळीराजा सोबत एक दिवस.. या उपक्रमातून.. वाचा सविस्तर -
आलिया भेटणार आता नव्या माध्यमातून... फिटनेस-मेकअपसह सांगणार फिल्म-लाईफबद्दल
मुंबई - आपल्या क्युट अदांनी चाहत्यांना नेहमीच भूरळ घालणारी आलिया भट्ट आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने अलिकडेच तिचे यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. यावर ती चाहत्यांना फिटनेस आणि मेकअप आदीचे धडे देताना दिसणार आहे. तिच्या यूट्यूब चॅनेलवर तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पिवळ्या साडीत 'टीप टीप बरसा' गाण्यावर डान्स करतानादेखील दिसत आहे. वाचा सविस्तर -