ETV Bharat / state

26/11 Mumbai Attack: मुंबई हल्ल्याच्या कटू आठवणी आजही हृदयात.. समाजात वीरांचा सहभाग हवा- देवेंद्र फडणवीस - हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी

26/11 Mumbai Attack: या निमित्ताने मुंबई विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सुद्धा या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धाजली तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

26/11 Mumbai Attack
26/11 Mumbai Attack
author img

By

Published : Nov 26, 2022, 1:35 PM IST

मुंबई: 26/11 Mumbai Attack: २६/११ दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने मुंबई विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सुद्धा या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धाजली तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई पोलीस आयुक्त, अधिकारी व कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?: या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या हल्ल्याच्या कटू आठवणी आजही हृदयात आहेत. परंतु त्याबरोबर ज्या पद्धतीने त्या हल्लेखोरांचा चोख मुकाबला मुंबई पोलीस Mumbai Police तसेच केंद्रीय पोलीस यांनी केला त्यांना सलाम. हा हल्ला मुंबईवर नाही तर भारताच्या सार्वभौमत्वेवर होता. पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादी पाठवून हा हल्ला घडविण्यात आला होता.

जवानांनी आपले बलिदान दिले: या हल्ल्याने जगभरात भारताची मान खाली करण्याचा प्रयत्न केला होता, पण आमच्या जवानांनी तसे होऊ दिले नाही. करकरे, कामटे, तुकाराम ओंबळे, संदीप उन्नीकृष्णन अशा अनेक जवानांनी आपले बलिदान दिले आहे. परंतु हा हल्ला परतवून लावला. त्या सर्वांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

समाजात वीर हवेत: पुढे फडणवीस म्हणाले की, या जवानांनी प्रयत्नांची शर्थ केली. परंतु ते मागे हटले नाहीत. आपल्या समाजात अशा जवानांचा अवश्य समावेश असायला हवा. नाहीतर समाजाचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही. असेही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याप्रसंगी त्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान सुद्धा याप्रसंगी करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.