ETV Bharat / state

IIT Hostel Mumbai :आयआयटी होस्टेलमध्ये 26 वर्षीय विद्यार्थ्याची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या - Suicide of Darshan Ramdhan Malviya

मुंबईतील आयआयटी होस्टेलमध्ये राहत असलेलल्या एका 26 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या (Student commits suicide IIT Hostel Mumbai) केली आहे. या 26 वर्षीय विद्यार्थ्याने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव दर्शन (Darshan commits suicide in IIT hostel) आहे. तसेच तो मध्यप्रदेश येथील होता. दर्शनने नैराश्येतून आत्महत्या केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

IIT Hostel Mumbai
IIT Hostel Mumbai
author img

By

Published : Jan 17, 2022, 10:56 AM IST

Updated : Jan 17, 2022, 12:03 PM IST

मुंबई: मुंबईच्या पवई येथील आयआयटी हॉस्टेलमध्ये (Suicide at Powai IIT Hostel) एका विद्यार्थ्याने आज आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. पवई आयआयटीमध्ये 26 वर्षीय दर्शन रामधन मालवीया (Suicide of Darshan Ramdhan Malviya) या विद्यार्थ्यांने हॉस्टेल इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन (Student commits suicide IIT Hostel Mumbai) उडी मारत आत्महत्या केली. दर्शन रामधन मालवीया असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच तो मुळचा मध्यप्रदेशच्या इंदोरचा राहणारा होता. तसेच त्याच्या खोलीमध्ये सुसाईड नोट मिळाली आहे.

  • Maharashtra | A 26-yr-old PG student of IIT Bombay died by suicide this morning, by jumping from the hostel's 7th floor. In his recovered suicide note, he stated he had depression & was under treatment, he didn't hold anyone responsible; further probe is underway: Mumbai Police

    — ANI (@ANI) January 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विद्यार्थ्यांचे वय 26 वर्षे असून मुंबई आयआयटीत पदव्युत्तर शिक्षण घेत होता. सुसाईड नोटमध्ये त्याने कुणालाही आत्महत्येसाठी जबाबदार धरलेले नाही. हा विद्यार्थी मागील अनेक दिवसांपासून डिप्रेशन मध्ये होता. त्याच्यावर उपचारही सुरु होते. नैराश्यातूनच त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. सोमवारी पहाटे साडे चारच्या सुमारास त्याने उडी मारल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच पवई पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली (Accidental death recorded in Powai police) आहे. तणावात त्याने हे पाऊल उचलल्याचे सुसाइड नोट मध्ये लिहिल्याचे पोलिसांचे म्हणने आहे. त्याचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पवई पोलीस याप्रकरणी अधीक तपास करत आहेत.

हेही वाचा : उत्पल पर्रिकर-भाजप वादात संजय राऊतांची उडी, म्हणाले सगळ्यांनी साथ द्या

Last Updated : Jan 17, 2022, 12:03 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.