ETV Bharat / state

शिवसेनेच्या २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचा राजीनामा; ऐन निवडणुकीत शिवसेनेला धक्का

author img

By

Published : Oct 10, 2019, 11:55 AM IST

भाजपसोबतच्या युतीमुळे सेनेला अनेक जागांवर पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे निवडणूक लढवण्याची संपूर्ण तयारी केलेल्या अनेक शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. कल्याण पूर्व येथील नाराज २६ नगरसेवक व ३०० कार्यकर्त्यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या सर्वांनी बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिले आहेत.

शिवसेना

मुंबई - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला स्वपक्षीयांच्या नाराजीचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. भाजपसोबतच्या युतीमुळे सेनेला अनेक जागांवर पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे निवडणूक लढवण्याची संपूर्ण तयारी केलेल्या अनेक शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. कल्याण पूर्व येथील नाराज २६ नगरसेवक आणि ३०० कार्यकर्त्यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या सर्वांनी बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात युतीमुळे तिकीट कापल्या गेलेल्या शिवसैनिकांची जाहीर माफी मागितली होती. मात्र, यामुळे फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. जागावाटप आणि उमेदवार निवडीविषयीची नाराजी जाहीर करण्यासाठी हे राजीनामे पाठवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसमोर पेच उभा राहिला आहे. आता उद्धव ठाकरे या सगळ्यातून कशाप्रकारे मार्ग काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा- नेत्यांसह कार्यकर्तेही थकलेल्या पक्षात राहायला तयार नाहीत, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला

Intro:मुंबई - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला स्वपक्षीयांच्या नाराजीचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. भाजपसोबतच्या युतीमुळे सेनेला अनेक जागांवर पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे निवडणूक लढवण्याची संपूर्ण तयारी केलेल्या अनेक शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. कल्याण पूर्व येथील नाराज 26 नगरसेवक व 300 कार्यकर्त्यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या सर्वांनी बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिले आहेत.

Body:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात युतीमुळे तिकीट कापल्या गेलेल्या शिवसैनिकांची जाहीर माफी मागितली होती. मात्र, यामुळे फारसा फरक पडल्याचे दिसत नाही.
जागावाटप आणि उमेदवार निवडीविषयीची नाराजी जाहीर करण्यासाठी हे राजीनामे पाठवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसमोर पेच उभा राहिला आहे. आता उद्धव ठाकरे या सगळ्यातून कशाप्रकारे मार्ग काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.